Pandharpur Wari 2019: संत तुकारामांची पालखी आज करणार प्रस्थान; वारकर्‍यांना शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं!

आज आषाढी वारी 2019 साठी देहू मधून तुकारामांची पालखी प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 20 दिवस चालणार्‍या या वैष्णवांच्या मेळाव्यात सहभागी वारकर्‍यांना शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्र

Pandharpur Wari 2019: संत तुकारामांची पालखी आज करणार प्रस्थान; वारकर्‍यांना शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं!
Ashadhi Wari (File Photo)

Sant Tukaram Maharaj Palkhi 2019:  महाराष्ट्रात वारकरी संप्रदयाचा प्रसार करणारे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्याने पंढरपूरच्या आषाढी वारीची (Ashadhi Wari) सुरूवात होते. आषाढी वारी 2019 ची सुरूवात आजपासून होणार आहे. देहूमधून आज संत तुकारामांच्या (Sant Tukaram) पालखीचे दुपारी अडीजच्या सुमारास प्रस्थान होणार आहे. तब्बल 21 दिवस, 250 किमीचा रस्ता वारकरी शिस्ताबद्ध पद्धतीने पूर्ण करतात. टाळ मृदुंगाच्या जयघोषामध्ये वारकरी अभंग गात, 'ग्यानबा तुकाराम'चा जयघोष करत वारी पूर्ण करतात. वारकरी संप्रदयाचं विशेष आकर्षण असणार्‍या या वारीमध्ये सहभागी होणार्‍यांसाठी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन त्यांचा प्रवास सुखकारक होण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी ही खास शुभेच्छापत्र. पहा गोल रिंगण, उभं रिंगण कधी असेल?

वारीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रिटिंग्स

  • जाता पंढरीसी

    सुख वाटे जीवा...

    वारकरी बांधवांना आषाढी वारीच्या शुभेच्छा!

Pandharpur Wari (File Photo)

  • चला पंढरीसी जाऊं ।रखुमादेवीवरा पाहूं ॥

    डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥

Pandharpur Wari (File Photo)

वारकरी बांधवांना आषाढी वारीच्या शुभेच्छा!

Pandharpur Wari (File Photo)

सुलभ माय पंढरिराणा । पुरवी खुणा अंतरीच्या

जन्मांतरीच्या पुण्यरासी । वारी त्यास पंढरी ॥

Pandharpur Wari (File Photo)

संत तुकाराम यांची पालखीचं प्रस्थान देहू येथून होते. यंदा 24 जून दिवशी त्याचं प्रस्थान होणार आहे. ही पालखी आकुर्डी, लोणी कालभोर,यावत, वरवंद, बारामती, इंदापूर, अकलूज, वखरी या भागातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2019 01:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).