
Ashadhi Wari 2019: यंदा 12 जुलै दिवशी आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi) सण आहे. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी आतुर वारकर्यांचा देहूतून आज संत तुकारामांच्या पालखीसह (Sant Tukaram Palkhi 2019) प्रवास सुरू होणार आहे. दुपारी अडीजच्या सुमारास संत तुकारामांची पालखी प्रस्थान ठेवेल. त्या पार्श्वभूमीवर देहू (Dehu) आणि आजबाजूच्या भागात वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. वारकर्यांसह नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी काही ठिकाणी वाहतूक वळवून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन ट्राफिक पोलिसांकडून करण्यात आलं आहे. यंदा 24 जूनला होणार 'संत तुकाराम महाराज पालखी' चं प्रस्थान; पहा गोल रिंगण, उभं रिंगण कधी असेल?
संत तुकाराम पालखी 2019 च्या पार्श्वभूमीवर कुठे केलेत वाहतुकीत बदल?
आजपासून (24 जून) बुधवार (26 जून) पर्यंत वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. पालखी देहू फाटा आळंदी चौकातून जाईपर्यंत पुणे - आळंदी रस्ता(मॅक्झिन चौक) बंद असून पुणे - दिघी मॅक्झिन चौक- मोशी चाकण या पर्यायी मार्गाचा वापर करावा. मोशी - देहू फाटा रस्ता या रस्त्याऐवजी मोशी - चाकण - शिक्रापूर किंवा मोशी - भोसरी - मॅक्झिन चौक - दिघी या रस्त्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. पहा माऊलींच्या पालखी 2019 चं संपूर्ण वेळापत्रक
पुणे आणि मुंबईकडून येणारी वाहतूक वळवण्यात आली आहे. पालखी आकुर्डी विठ्ठल मंदिरात पोहचे पर्यंत मुंबईकडून भक्ती शक्ती चौकाकडून येणारी वाहतूक भोसरीकडे जाण्यासाठी त्रिवेणीनगर, थरमॅक्स चौक, चिंचवड, वाकडसाठी भेळ चौक, संभाजी चौक या रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आलं आहे.
तळवडे - देहूगाव जाणार्या कॅनबे चौकऐवजी देहू आळंदी रस्त्यावरून कॅपजेमिनी चौक ते निघोजी एमआयडीसी रस्ता, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा रस्ता या पर्यायी मार्गांचा वापर करायचा आहे.
आज 24 जून दिवशी देहूहून संत तुकाराम महाराजांची तर 25 जून दिवशी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान ठेवणार आहे.