Ashadhi Wari 2019: संत तुकाराम महाराज यांच्या 334 व्या पालखीचं आज देहू मधून प्रस्थान
Sant Tukaram Palkhi Sohala 2019 (Photo Credits : commons.wikimedia)

Ashadhi Ekadashi Pandharpur Wari 2019:  आषाढ महिना लागला की वारकर्‍यांना वारीचे वेश लागतात. संत ज्ञानेश्वर म्हणजे माऊली आणि तुकारामांच्या पालखी या आषाढी वारीचं (Ashadhi wari)  आकर्षण असतात. आषाढी वारी 2019  साठी आज (24 जून) दिवशी जगद्गुरू संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Palkhi) यांच्या 334 व्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपर्‍यामधून भाविक देहूमध्ये (Dehu) जमले आहेत.पहा माऊलींच्या पालखी 2019 चं संपूर्ण वेळापत्रक 

वारकरी सांप्रदयातील भाविक आजपासून पुढील 21 दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपूरला विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी निघणार आहे. आज तुकारामांची जन्मभूमी देहूमधून तुकारामांची पालखी प्रस्थान ठेवणार आहे. सकाळपासूनच देहूच्या मंदिरात पारंपारिक पूजेला सुरूवात झाली आहे. दुपारी अडीजच्या सुमारास संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होईल.  संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सविस्तर वेळापत्रक; गोल रिंगण, उभं रिंगण कधी असेल?

महाराष्ट्र राज्याचे महसूल आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पादुकांचे पूजन होणार आहे. त्यानंतर यंदाची संत तुकारामांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. दरम्यान भाविकांची गर्दी पाहता वाहतुकीमध्येही बदल करण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवत नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.