
Mahaparinirvan Din Quotes in Marathi: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते दलितांचे उद्धारदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. BR Ambedkar) यांचा आज (6 डिसेंबर) 66 वा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) आहे. 6 डिसेंबर 1956 दिवशी बाबासाहेबांनी दिल्ली मध्ये अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचं तत्त्व आणि ध्येय म्हणजे महापरिनिर्वाण. महापरिनिर्वाण या शब्दाची फोड केल्यास त्यामागील अर्थ समजण्यास मदत होते. महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यू नंतर निर्वाण म्हणजेच मुक्ती असा होतो. त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधत देशभरातील आंबेडकरी जनता, बौद्ध धर्मीय तसेच भीम अनुयायी दादर शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर येऊन त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतात.
भारतीय समाजातील जातीव्यवस्थेतील त्रृटी समोर आणत आंबेडकरांनी दलित, अस्पृश्य समजल्या जाणार्यांना आधार दिला. बौद्ध धर्माचा अभ्यास करून त्याची शिकवण पुन्हा समाजात पसरवण्याचं काम विविध मार्गांनी केलं. सोबतच मागास राहिलेल्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. (हे देखील वाचा: Mahaparinirvan Din 2022: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे चालवणार 14 अनारक्षित विशेष गाड्या; जाणून घ्या सविस्तर)
जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो,
तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो..
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक (भारतीय संविधान) लिहिले की,
ज्याने आज भारत देश चालतोय..
अश्या महामानवाच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

दलितांचे ते तलवार होऊन गेले,
अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच,
पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले..
जय भीम !

समाजपरिवर्तनाचे शस्त्र मानून,
ज्यांनी शिक्षणाचा केला प्रसार..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते हे थोर विचार..
महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारत अनेकांना या धर्माची दीक्षा दिली. दरम्यान भारतातील अनुसूचित जाती, जमातींच्या लोकांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तरावर सक्षम करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी भरीव कामगिरी केली आहे. या दिवसाचं औचित्य साधत त्यांच्या त्यांना आदरांजली अर्पण करा.