नवरात्रोत्सव (File Photo)

शारदेय नवरात्र उत्सव (Navratri 2022) देशभरात धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. आज नवरात्राचा (Navratri) सहावा दिवस. नवरात्रीच्या या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या (Durga Mata) नऊ वेगवेगळ्या रुपांना समर्पित केल्या जाते. आज नवरात्राची सहावी माळ असून नवदुर्गेचे सहावं रुप स्वरुप कात्यायनी देवीला (Devi) समर्पित आहे. तसेच आजचा रंग राखडी (White) आहे. नवरात्रीच्या (Navratri) नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची भक्ती भावाने पूजा केल्या जाते. काही भाविक आपल्या घरी घटची स्थापना करत दुर्गा मातेची भक्ती भावाने पुजा करतात. नवरात्र हा उत्सव फक्त महाराष्ट्रातचं (Maharashtra) नाही तर संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. वेगवेगळ्या राज्यातील पध्दती वेगळ्या असल्या तरी विविधतेने हा उत्सव देशाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो.

 

आज शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस आहे. पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. या दिवशी माँ दुर्गेच्या सहाव्या रूपाची म्हणजेच देवी कात्यायनीची (Katyani) पूजा आणि उपवास केला जातो. देवी कात्यायनी यश आणि कीर्तीचं दैवत आहे. ती चतुर्भुज असलेल्या सिंहावर (Lion) स्वार झालेली देवी आहे. तिने दोन हातात कमळ (Lotus) आणि तलवार धारण केली आहे. तर एक हात वर मुद्रामध्ये आणि दुसरा हात अभय मुद्रामध्ये असतो. ऋषी-मुनींना राक्षसांच्या अत्याचारापासून मुक्त करण्यासाठी देवी दुर्गेने कात्यायन ऋषींच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला म्हणून या देवीच्या रुपास कात्यायनी देवी असं म्हणतात. (हे ही वाचा:- Diwali 2022 Calendar: 23 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे दिवाळीचा सण; धनत्रयोदशीपासून भाऊबीजपर्यंतच्या सणाच्या तारीखा आणि मुहूर्त जाणून घ्या)

 

जर तुम्ही कुठले कठीण काम सुरू करणार असाल आणि त्यात यश मिळवायचे असेल तर तुम्ही देवी कात्यायनीची पूजा केल्यास विशेष लाभ मिळतो. देवी कात्यायनीची उपासना केल्याने यश मिळते. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी देवी कात्यायनीचीही पूजा केली जाते. कात्यायनी देवी नकारात्मक शक्तींचा नाश करणारी देवी आहे. कात्यायनीची मनोभावे पूजा केल्यास कुठल्याही मोठ्या अडचणीवर मात करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते.