Nag Panchami 2022 Date: नागपंचमी सणाची तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी, जाणून घ्या
नागपंचमी

Nag Panchami 2022 Date: हिंदू धर्मातील महत्वाचा सण नागपंचमी मंगळवारी  2 ऑगस्ट रोजी आहे.नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. नागपंचमी या सणाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पुजा केली जाते. नागाची पुजा करून नाग देवताला दूध लाह्यांचा नैवद्य दाखवले जाते. नागपंचमीच्या दिव शी नागाला ईजा होऊ नये म्हणून शेतकरी शेतात नांगर देखील फिरवत नाही. या दिवशी घरात विळी, तवा, कात्री देखील वापरली जात नाही. धार्मिक मान्यतेनुसार, नागाची पूजा केल्याने सुख, संपत्ती घरात नांदते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये काल सर्प हा दोष असेल तर नागपंचमीची पूजा भक्ती भावाने केल्यास दोष निघून जातो. असे मानले जाते, चला तर जाणून घेऊया, नागपंचमीची पूजा कशी केली जाते आणि शुभ मुहूर्त कधी आहे, जाणून घ्या [हे देखील वाचा:- Nag Panchami 2022 Date & Significance: Know Rituals, Shubh Tithi, Different Serpent Gods and Nagula Chavithi Customs To Celebrate the Festivals of Snakes]

नागपंचमीचा शुभ मुहूर्त

पंचमी तिथी 2 ऑगस्ट 2022 :- पहाटे 05:13 पासून आरंभ 

पंचमी तिथी 3 ऑगस्ट 2022 :- रोजी पहाटे 05:41 वाजता संपन्न 

नागपंचमी पूजनाचा शुभ मुहूर्त 

सकाळी 06:05 ते संध्याकाळी 08:41 पर्यंत

नागपंचमीसाठी नैवेद्य 

महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात नागपंचमी निमित्त खास पंचपक्वानं बनवले जातात. ज्वारीच्या लाह्यापासून बनवलेले पौष्टिक लाडू, खीर कान्होले, गोड खांडवी, गव्हाची खीर यांसारखे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. नागपंचमीला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर, गोवा मध्ये हळदीच्या पानातल्या पातोळ्या करण्याची पद्धत आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागात पुरणाचे दिंड केले जातात. 

नागपंचमीची पूजा विधी

सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. गोडाचा नैवेद्य तयार करावा. नाग देवता वारुळात असतात. त्यामुळे स्त्रिया वारूळ असेल त्याठिकाणी जाऊन पूजा करतात. नागदेवतांची पूजा करताना हळद, रोळी, तांदूळ, फुले अर्पण केली जातात. कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळून नागदेवतेला अर्पण केले जाते. यानंतर नागदेवतेची आरती करून नागदेवतेचे मनाने प्रार्थना केली जाते. दरम्यान, नागपंचमीला स्त्रिया वेगवेगळे खेळ खेळतात, नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याचे विशेष महत्व असते. 

नागपंचमीच्या दिवशी कोणत्या देवतांची पूजा केली जाते, जाणून घ्या 

नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते.