
Mohini Ekadashi: मोहिनी एकादशी ही वर्षभरात येणार्या सार्या एकादशींपैकी सर्वात पुण्यवान एकादशी समजली जाते. वैशाख शुक्ल एकादशी दिवशी मोहिनी एकादशी असते. यंदा ही एकादशी 15 मे दिवशी भारतभर साजरी केली जाणार आहे. विष्णू पुराणानुसार, मनुष्याला मोह मायेपासून सुटका मिळवण्यासाठी मोहिनी एकादशीचं व्रत फायदेशीर असतं. या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची आराधना केली जाते. त्यामुळे आजचं हे मोहिनी एकादशीचं व्रत नेमकं कसं केलं जातं? हे नक्की जाणून घ्या.
मोहिनी एकादशीचा मुहूर्त :
एकादशी सुरू होण्याची वेळ - 12:59 PM (14 मे)
एकादशी संपण्याची वेळ - 10:36 AM (15 मे)
एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ - 05:34 AM ते 08:15 AM (16 मे)
नक्की वाचा: Mohini Ekadashi 2019: 'मोहिनी एकादशी' का म्हटले जाते? काय आहे या एकादशीचे महत्त्व?
मोहिनी एकादशी दिवशी काय कराल?
मोहिनी एकादशी दिवशी दिवसभर उपवास ठेवला जातो. या काळात फळं, दूध असा हलका आहार घेतला जातो. तसेच विष्णूसहस्त्र नामावलीचं पठण केलं जातं. मोहिनी एकादशीच्या व्रतामध्ये तीळ, तुळस आणि ऋतूमानाप्रमाणे उपलब्ध असणारे फळं याचा समावेश केला जातो. त्याचे दानही दिले जाते.
मोहिनी एकादशी दिवशी काय करू नये?
मोहिनी एकादशी दिवशी व्रत करणार असाल तर राग,मत्सर यासारख्या नकारात्मक भावनांपासून दूर रहा. मन शांत आणि स्थिर ठेवून उपवास करा.मोहिनी एकदशीच्याउपवासा दरम्यान भात वर्ज्य करावा असं सांगितले जाते.
सीतेच्या वियोगातील दुःखातून मुक्त होण्यासाठी भगवान श्रीरामाने मोहिनी एकादशीचे व्रत केले होते. तर युद्धिष्ठिर ने देखील दुःखातून मुक्त होण्यासाठी विधीवत हे व्रत केले होते. असं सांगितलं जातं.