Margashirsha Guruvar Vrat Sahitya: मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली की महिलावर्गाला ओढ लागते ती महालक्ष्मीच्या व्रताच्या पहिल्या गुरुवारची. महिलांसाठी खूप चांगले आणि त्यांच्या आयुष्यात सुख-शांती, स्थैर्य निर्माण करणारे हे व्रत खूपच फायदेशीर असते. त्यामुळे महिलाही खूप श्रद्धेने आणि मनोभावे या व्रताची स्थापना करतात. या पूजेसाठी त्यांची विशेष तयारीही सुरु झाली आहे. महालक्ष्मीची अगदी मनोभावे केलेली आराधना, केलेला उपवास हे व्रत आज अनेक ठिकाणी गावापासून अगदी शहरापर्यंत केलेलं दिसून येतं.नोकरदार महिला आपल्या ऑफिसवरुन घरी परतताना यासाठी लागणारे साहित्य घेतील. तर गृहिणीही आज संध्याकाळी या व्रतासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी बाजारात जातील.
हे व्रत तरुण मुली देखील करु शकतात. त्यामुळे जे हे व्रत पहिल्यांदाच करत आहेत किंवा ज्यांना या व्रतासाठी लागणारे साहित्य माहित नसेल त्यांच्यासाठी आम्ही आज या साहित्याची संपूर्ण यादी सांगणार आहोत.
येथे पाहा व्रतासाठी लागणा-या साहित्याची संपूर्ण यादी:
1. 5 प्रकारची फळे
2. 5 आंब्याची पाने
3. विड्याचे पान
4. पूजेसाठी फुलं
5. सुपारी
6. गजरा/वेणी
7. नथ
8. हार
9. हिरव्या रंगाचा छान बोर्डर असलेला ब्लाऊजपीस
10. देवीचा मुखवटा
11. नारळ
12. मंगळसूत्र
13. हळद-कुंकू
14. तांदूळ
15. अगरबत्ती
16. महालक्ष्मीचे पुस्तक
17. पाट किंवा चौरंग
18. सुट्टे पैसे
उद्यापनाच्या दिवशी सर्व सुवासिनींना हळदीकुंकू देऊन फळ, महालक्ष्मी व्रताची पुस्तिका दिली जाते. यावेळी कुमारिका बोलावूनही त्यांचा मान राखला जातो. त्यांना भोजन देऊन त्यांची खणा-नारळाने ओटीही भरली जाते. ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे हे व्रत केलं जातं. कुणी हे व्रत थाटात करतं तर कुणी अगदी साध्या पद्धतीने करताना दिसतं.