Margashirsha Guruvar Vrat (Photo Credits: Instagram)

Margashirsha Laxmi Vrat 2019: मार्गशीर्षातील गुरुवार धरणा-या महिलांनी ही पूजा करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. मार्गशीर्षातील गुरुवारचे व्रत धरणा-या महिलांसाठी या व्रताच्या पूजेची मांडणी करणे, वैभवलक्ष्मीची पूजा करणे, कथेचे पठण करणे या गोष्टी जितक्या महत्वाच्या असतात तितकेच या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी करणे कटाक्षाने टाळणे गरजेचे असते. पूजा ही अशी एक गोष्ट आहे की असे केल्याने देव प्रसन्न होतो म्हणून प्रत्येक हिंदू धर्मात दररोज देवाची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सुख-शांती, प्रसन्नता सदैव राहते. मार्गशीर्षातील या गुरुवार व्रतासाठी अनेक महिला उपवासही करतात. त्यामुळे पुण्य मिळते आणि घरात लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते असे या मागचे शास्त्र आहे.

मात्र या गोष्टींसह जर तुम्ही पुढे दिलेल्या 5 गोष्टी पूजेआधी करणे टाळले तरच तुमची पूजा सफल होईल आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहिल.

पाहा कोणत्या आहेत या '5' गोष्टी:

1) आंघोळ न करता म्हणजेच पारोशी अंगाने पूजेला बसू नये तसेच पारोशी अंगाने पूजेच्या कोणत्याही वस्तूस हात लावू नये. Margashirsha Guruvar Vrat 2019 Dates: यंदा मार्गशीर्ष गुरूवार व्रत कोणत्या 4 दिवशी केले जाणार?

2) शौच केल्यानंतर लगेच पूजेस बसू नय. सहसा अनेक जण सकाळी शौचालयात आणि मग आंघोळ करुन पवित्र होतो. त्यानंतर पूजेस बसल्यास काही हरकत नाही. मात्र आंघोळ केल्यानंतर पुन्हा शौचास जाऊन त्यानंतर पूजेस बसणे चुकीचे आहे. असे झाल्यास पुन्हा आंघोळ करावी.

3) भांडणानंतर कधीही पूजेस बसू नये. पूजा नेहमी शांत मनाने केली जाते हे दु:खी किंवा संतापलेल्या मनाने कधीही करु नये जेव्हा आपण एखाद्याशी भांडण करता तेव्हा आपले मन विचलित होते. यामुळे तुमचे विचार शुद्ध होत नाहीत. Margashirsha Guruvar Mahalaxmi Aarti: महालक्ष्मी आरती करून आजच्या मार्गशीर्ष गुरूवार व्रताची करा सांगता!

4) जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार केला असेल तर त्या दिवशी पूजेमध्ये बसू नका. हे करणे आपल्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकतात. देव सर्व प्राण्यांवर प्रेम करतो. प्राणी देखील मानवा समान असतात त्यामुळे मांसाहार करुन पूजेस बसू नये.

5) साफसफाईची कामे केल्यानंतर पूजेस बसू नये. आंघोळ केल्यानंतर केरकचरा, फरशी साफ करणे अशी कामे करुन पूजेस बसल्यास ते अशुभ मानले जाते. त्यामुळे ही सर्व कामे आंघोळीआधी करावी. त्यानंतर स्वच्छ आंघोळ करुन पूजेला बसावे.

तसेच आंघोळ केल्यानंतर नेहमी स्वच्छ कपडे घाला. घाणेरडे किंवा मळकटलेले कपडे घालून पूजेला बसल्यास त्यातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जे कदाचित आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी देखील अनिष्ठ मानले जाते.