Margashirsha Guruvar Mahalakshmi Aarti: मार्गशीर्ष महिना हा मराठी महिन्यांनुसार, नववा महिना आहे. श्रावणाप्रमाणेच मार्गशीर्ष महिना देखील हिंदू धर्मीयांसाठी खास असतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. इंग्रजी कॅंलेडरनुसार मार्गशीर्ष महिना नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात येतो. दरम्यान घरात सुख, शांती आणि आर्थिक भरभराट व्हावी याकरिता दर गुरूवारी लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी महिला महालक्ष्मी व्रत करतात. दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीच्या पूजेनंतर तो सोडला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पूजेसाठी घ्रात सवाष्ण महिला, तरूणी घटमांडणी करून लक्ष्मीच्या मुखवट्याची पूजा करतात. मग या पूजेच्या सांगतेवेळेस महालक्ष्मीची आरती करून मांगल्याची प्रार्थना करण्याची पद्धत आहे. मग यंदा तुम्ही देखील मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे व्रत चार गुरूवारी करणार कराल तर महालक्ष्मीच्या व्रत कथेसोबतच या आरतीने देवीला प्रसन्न करण्यासाठी नक्की प्रयत्न करा. Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा विधी, नियम व वैभवलक्ष्मी घट मांडणी कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
मार्गशीर्ष गुरूवारचे यंदा 4 दिवसाचे व्रत आहे. पहिला गुरूवार 28 नोव्हेंबर दिवशी असून मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरूवार 19 डिसेंबर दिवशी आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारच्या व्रतासोबतच मार्गशीर्ष पौर्णिमा देखील तितकीच खास असते.
महालक्ष्मी आरती
जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारी महालक्ष्मी व्रताचे पालन करतो त्याच्या संसारात देवीचा वरदहस्त टिकून राहतो. परिणामी धनधान्य, समृद्धी याची वृद्धी होत राहते. अशी अनेकांची धारणा आहे. त्यामुळे अनेक महिला गुरूवारी महालक्ष्मी पूजा घरी मांडतात तर काही केवळ उपवास करतात. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरूवारी महिला एकमेकींच्या घरी जाऊन भेटवस्तू, प्रसाद आणि फुलं देऊन या व्रताची सांगता करतात.