Margashirsha Guruvar Vrat 2019 Dates: यंदा मार्गशीर्ष गुरूवार व्रत कोणत्या 4 दिवशी केले जाणार?
श्री महालक्ष्मी (Photo Credit : Youtube)

Margashirsha Guruvar Vrat 2019 : मराठी महिन्यातील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष. श्रावणाप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्याला देखील धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या महिन्यात अनेक सौभाग्यवती स्त्रिया महालक्ष्मीचं व्रत (Mahalaxmi Vrat) करतात, हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात. तसेच या माहिन्यात मांसाहार करणं देखील निषिद्ध मानलं जातं. त्यामुळे कार्तिक महिना संपल्यानंतर सुरू होणारा हा मार्गशीर्ष महिना यंदा 27 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. तर मार्गशीर्ष महिना 26 डिसेंबर दिवशी संपणार आहे. या महिन्यामध्ये दर गुरूवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. त्याचा उपवास असतो. मग जाणून घ्या यंदा मार्गशीर्ष गुरूवार व्रताचे नेमके चार दिवस कोणते?

मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते. तयचा उपवास केला जातो तसेच घरामध्ये घट स्थापन करून महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते. Margashirsha Guruvar Vrat Katha: मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताची कथा नेमकी काय?

यंदा मार्गशीर्ष गुरूवार चे 4 दिवस कोणते?

पहिला गुरूवार - 28 नोव्हेंबर 2019

दुसरा गुरूवार - 5 डिसेंबर 2019

तिसरा गुरूवार - 12 डिसेंबर 2019

चौथा गुरूवार - 19 डिसेंबर 2019

महालक्ष्मी ही देवता धनधान्य, समृद्धी, पैसा यांची देवता आहे. त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात तिची पूजा केली जाते. . दर गुरुवारी नेमाने महालक्ष्मीची पूजा केली जाते.तसेच या केल्या जाणाऱ्या या पुजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी सवाष्णींना हळदीकुंकू, फळे देऊन इतर वाण लुटले जाते.

प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत (Mahalakshmi Vrat) केले जाते. कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे व्रत केले जाते.