Margashirsha Guruvar 2023 Wishes In Marathi: मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे Messages, WhatsApp Status!
मार्गशीर्ष गुरूवार व्रत । File Image

महिलांसाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवार (Margashirsha Guruvar) खास असतो. अनेक घरांमध्ये मार्गशीर्ष गुरूवारी महालक्ष्मी व्रत (Margashirsha Guruvar Mahalaxmi Vrat) केले जाते. 13 डिसेंबर पासून सुरू झालेल्या मार्गशीर्ष महिन्यातील हा 21 डिसेंबर चा दुसरा मार्गशीर्ष गुरूवार आहे. या निमित्ताने घरात महालक्ष्मीच्या रूपात घट स्थापन केला जातो आणि त्याची पूजा करण्याची पद्धत आहे. मग अशा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, आप्तेष्टांना देऊन त्यांचा दिवस खास करण्यासाठी ही खास मराठमोळी शुभेच्छापत्रं, Wishes, Greetings, Images, Messages शेअर करून तुम्ही या दिवसाची सुरूवात खास करू शकता.

मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारी काही जणी उपवास ठेवतात. सकाळी घट स्थापन करून तिची महालक्ष्मीच्या रूपात सजावट करून पूजा करतात. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरूवारी ही रीत पाळली जाते. शेवटच्या गुरूवारी सवाष्ण महिलांना घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू दिलं जातं. Margashirsha Guruvar Vrat 2023 Katha: मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी कथा काय? घ्या इथे जाणून .

मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या शुभेच्छा

मार्गशीर्ष गुरूवार व्रत । File Image
मार्गशीर्ष गुरूवार व्रत । File Image
मार्गशीर्ष गुरूवार व्रत । File Image
मार्गशीर्ष गुरूवार व्रत । File Image
मार्गशीर्ष गुरूवार व्रत । File Image

मार्गशीर्ष गुरूवारी घरात सकाळ संध्याकाळ घटाची पूजा करून महालक्ष्मी व्रताची कहाणी देखील वाचली जाते. यानिमित्ताने घरात सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट येऊ दे यासाठी प्रार्थना केली जाते.