Marathi Bhasha Din 2021 Quotes: मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज (Kusumagraj) यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 27 फेब्रुवारीला ‘मराठी भाषा दिवस’ साजरा केला जातो. महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कवी कुसुमाग्रज यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Language Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. खालील फोटोज वापरून मराठी भाषा दिन निमित्त कुसुमाग्रज यांचे विचार WhatsApp, Facebook वर शेअर करत मराठी भाषिकांना खास शुभेच्छा नक्की द्या. (वाचा - Marathi Bhasha Din 2021: 'या' कारणामुळे कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो मराठी राजभाषा दिन!)
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जाळत जाणं
- कुसुमाग्रज
विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती,
म्हणून नव्हती भीती तिला पराजयाची
जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली,
म्हणून नाही खंतही तिजला मरावयाची
- कुसुमाग्रज
जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी
- कुसुमाग्रज
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्याखोऱ्यातील शिळा
- कुसुमाग्रज
मायबोली माझी मराठी
तिच्यात मायेचा ओलावा
वेगवेगळ्या शब्दालंकारात
घेते हृदयातील खोलावा
- कुसुमाग्रज
माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात
संतांच्या शब्दात..इतिहासाच्या पानात
तेव्हा हसून सारीजण म्हणलीत
आम्ही शोधलं आमचं मराठीपण
या भूमीवरील माणसांच्या मनात
- कुसुमाग्रज
वि. वा. शिरवाडकर यांनी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने काव्यलेखन केलं. त्यांचा जन्म पुणे येथे झाला होता. त्यांनी नासिक येथे आपले शिक्षण पूर्ण केले. कुसुमाग्रज यांनी 1934 ते 1936 या काळात चित्रपटव्यवसायात काम केले. त्यानंतर त्यांनी पुणे, मुंबई व नाशिक येथील विविध नियतकालिकांत संपादक म्हणून काम केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी सत्याग्रह केला होता. जीवनलहरी, विशाखा, किनारा, मराठी माती, हिमरेषा, वादळवेल हे कुसुमाग्रज काही प्रकाशित काव्यसंग्रह आहेत.