गणेशोत्सवादरम्यान पुण्यात या 5 मानाच्या गणपतींचा असतो खास थाट !
छायाचित्र सौजन्य - Fabebook

पुणे : गणपती हा ८ कला आणि ६४ विद्यांचा अधिपती आहे. अनेकांचं लाडक दैवत असलेला गणपती भाद्रपद शुद्ध चतुर्थी या  दिवशी अनेक घराघरात विराजमान होतो. किमान दीड ते दहा दिवस गणेश मूर्तींचे घरी आगमन होते.

आजकाल घरगुती गणपतींचे प्रमाण वाढले असेल तरीही पूर्वी सार्वजनिक स्वरूपामध्ये गणेशोत्सव साजरा होतो. पुण्यातून गणेशोत्सवाला सुरूवात झाली होती. मग पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात मानाच्या गणपतींना विशेष स्थान असतं. मग पहा या  मानाच्या गणपतींमध्ये कोणकोणत्या ५ गणपतींची वर्णी लागते  ?

1. कसबा गणपती

कसबा पेठ गणपती हे पुण्याच ग्रामदैवत आहे. या गणपतीची मूळ मूर्ती तांदुळाएवढी होती. त्यानंतर शेंदूर लेपनानंतर त्याची उंची साडेतीन फूट झाली. शहाजी राजांनी 1636 लाल महालात त्याची स्थापना केली. शिवाजी महाराज मोहिमे वर जाण्यापुर्वी त्याचे दर्शन घेउन बाहेर पडत असत. चांदीच्या पालखीतून या गणपतीची मिरवणुक निघते. विसर्जनामध्येही हा गणपती पाहिला विसर्जित होतो.

2. तांबडी जोगेश्वरी

हा मानाच्या गणपतींमधील दुसरा आहे. दरवर्षी या गणपतीचे विसर्जन होते. पुढील वर्षी नवीन मूर्ती बनवली जाते. मिरवणुकी दरम्यान पालखीत चांदीची मूर्ती ठेवली जाते.

3.गुरूजी तालीम मंडळ

नावातच या गणपतीच वैशिष्ट्य आहे. पूर्वी हा गणपती तालमीत बसवला जात असे. हा गणपती हिन्दू मुस्लिम ऐक्याच प्रतिक आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वप्रथम या गणपती मंडळाकडून गुलाल उधळला जातो.

4. तुळशीबाग गणपती

तुळशीबाग गणपती हा देखाव्यंसाठी लोकप्रिय आहे. या मंडळाची मूर्ती फायबरची बनलेली असते. प्रमुख्याने समाज प्रबोधनपर देखावे बनवण्याकडे कल असतो. त्यामुळे भाविकांचे गणेशमुर्तीप्रमाणेच यंदा कोणता देखावा असेल याबबातही उत्सुकता असते.

5. केसरी वाडा गणपती

केसरी संस्थेचा गणपती १८९४ सालपासून सुरु झाला. पूर्वी विंचुरवाडा आणि त्यानंतर केसरी वाडयात हा उत्सव सुरू झाला.