राज्यातील मुस्लिम बांधवांसाठी आनंदाचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश राज्यात कानपूर, लखनऊ येथेही दिसला ईदचा चांद. देशभरातील विविध ठिकाणी चंद्र दर्शन. भारतभर उद्या साजरी होणार रमजान ईद.

नांदेड जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांची उत्सुकता आणि अतुरताही अखेर संपली असून आकाशात ईदचा चांद दिसला आहे. मुंबई, अहमदनगर, नाशिक आदी ठिकाणी चंद्र दर्शन घडल्यामुळे उद्या राज्यभरात रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळणार आहे.

ईद साजरी करण्यासाठी मोठ्या आतुरतेने आकाशाकडे डोळे लाऊन बसलेल्या मुंबईतील मुस्लिम बांधवांना अखेर चंद्र दर्शन घडले आहे. त्यामुळे शहरात ईदचा उत्साह सुरु झाला आहे. ईतचा चंद्र दिसल्याने मुंबई आणि राज्यभरात उद्या साजरी होणार रमजान ईद.

चंद्र दर्शन घडल्याने अहमदनगरमध्ये ईदचा उत्साह सुरु झाला आहे. आज रात्री आठच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथे चंद्र दर्शन घडले

मुंबई शहर, उपनगर आणि उपनगरांलगतचा काही भागांत चंद्र दर्शन घडल्याचे वृत्त आहे. प्रामुख्याने वर्सोवा येथे चंद्र दर्शन घडल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

जगभरातील इस्लाम धर्मिय बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना समाप्तीच्या टप्प्यात आला आहे. आकाशात चंद्र दर्शन होताच रमजान महिना समाप्त होईल आणि शवालचा महिना सुरु होईल. 

 अद्यापही चांद न दिसल्याने ईदसाठी प्रतिक्षाच करावी लागत आहे. ईदची तयारी जय्यद झाली असतानाही चंद्र दर्शन न होणे हे उत्सुकता वाढवणारे आहे. 

 ईदच्या जल्लोषासाठी मुस्लिम बांधवांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, सर्वांनाच उत्सुकता आहे ती, चंद्र दर्शनाची. अद्याप तरी चंद्र दर्शन घडले नाही. त्यामुळे ही उत्सुकता कायम आहे. 

जगभरातील ईद उत्सवावर नजर टाकता संयुक्त राष्ट्र (UAE) च्या मून सायटींग कमिटीने 4 जून रोजीच ईद साजरी करण्याचे ठरवले आहे. या कमिटीनुसार शवालचा महिना मंगळवारपासून सुरु होत आहे.ईद म्हणजेच ईद-उल-फितर हा मुस्लिम धर्मियांचा अत्यंत पवित्र सण म्हणून ओळखला जातो. हा सण इस्लाम धर्मिय मोठ्या उत्साहात साजरा करतात. 

औरंगाबाद, नांदेड, जालना, अहमदनगर येथे दिसणार ईदचा चांद . ईदचा चांद पाहण्यासाठी मुस्लिम बांधवांमध्ये  उत्साह अधिकाधिक वाढत चालला आहे. तर ज्या दिवशी ईदचा चंद्र दिसून येतो तो दिवस रमजानचा शेवटचा दिवस असल्याचे मानले जाते. त्याचसोबत रमजान संपल्यानंतर ईद-उल-फितर साजरी करण्यात येते

Load More

Maharashtra Aurangabad, Nanded, Jalna, Ahmednagar Eid Moon Sighting 2019 Eid Al Fitr Announcement Live Updates: रमजान-उल-मुबारकचा महिना सप्तमीच्या टप्प्यात आहे. तत्पूर्वी रजमानला सुरुवात झाल्यापासून मुस्लिम बांधवांमध्ये या उत्सावासाठी जोरदार तयारी करण्यात येते. 'नेक' कामे करण्याचा महिना अशी रमजान महिन्याची ओळख असल्याचे म्हटले जाते. त्याचसोबत रमजान हा मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र सण मानला जातो.

तर औरंगाबाद, नांदेड, जालना, अहमदनगर येथे ईदचा चांद आज दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये ईदचा चांद पाहण्यासाठी उत्साह अधिकाधिक वाढत चालला आहे. तर ज्या दिवशी ईदचा चंद्र दिसून येतो तो दिवस रमजानचा शेवटचा दिवस असल्याचे मानले जाते. त्याचसोबत रमजान संपल्यानंतर ईद-उल-फितर साजरी करण्यात येते.(LIVE Eid Moon Sighting in Middle East, Chand Raat 2019 LIVE: सौदी अरेबियात चांद दिसला; उद्या साजरी होणार ईद)

या दिवशी मुस्लिम बांधव नवीन पोषाख परिधान करुन एकमेकांना या सणाचा भरभरुन शुभेच्छा देतात. तसेच पंचपक्वान्नांची मेजवानी या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घरी असते. रमजानच्या काळात एकमेकांबद्दलचा राग-द्वेष बाजूला ठेवून मोठ्या आनंदाने हा सण साजरा करण्यात येतो. परंतु ईदचा चांद दिसल्यानंतर पवित्र रोजा सोडण्याची प्रथा आहे.