
महाविद्वान, महानायक, महान इतिहासकार, भारतीय संविधान निर्मिता, युगपुरुष, बोधीसत्व, महामानव अशी अनेक बिरुदे लाभलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा उद्या, 6 डिसेंबर रोजी 65 वा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din 2021). बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्या गावात झाला आणि 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे निधन झाले. याच्या दुस-या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पध्दतीने अंतिम संस्कार करण्यासाठी आले होते. निधनापूर्वी त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता.
देशाची वैचारिक घडी व्यवस्थित बसवण्यात बाबासाहेबांचे फार मोठे योगदान आहे. जातिव्यवस्था हा भारतीय समाजाला जडलेला जुनाट आजार. हा आजार मुळापासून उखडून टाकल्याशिवाय भारतीय समाजाची व भारताची प्रगती होणार नाही, ही त्यांची धारणा होती. शिक्षणाची कास धरून, शिक्षणप्रसाराचा ध्यास त्यांनी घेतला होता. बाबासाहेब हे केवळ वैचारिक मांडणी करणारे विचारवंत किंवा तत्त्वज्ञच नव्हते, तर ते एक कृतिशील महापुरुष होते. अशा या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून करा अभिवादन.
नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना!

दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

सागराचे पाणी कधी आटणार नाही
बाबांची आठवण कधी मिटणार नाही
हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी,
नाद हा 'भिमाचा' सुटणार नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!

ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल,
त्याला लढावे लागेल, आणि
ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल,
कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन... विनम्र अभिवादन!

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची,
तू जगाला शिकवली व्याख्या, माणसातल्या माणुसकीची
तू देव नव्हतास, तू देवदुतही नव्हतास
तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास
महासूर्याला अभिवादन!

दरम्यान, बाबासाहेबांवर जिथे अंतिम संस्कार करण्यात आले ती जागा चैत्यभूमी म्हणून ओळखली जाते. बौद्ध धर्मीय आणि भीम अनुयायींसाठी ही जागा पवित्र आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी इथे जमा होतात. परंतु सध्या देशावर असलेल्या कोरोनाच्या सावटामुळे घरूनच महामानवाला अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा: Mahaparinirvan Din 2021 Chaityabhoomi Live Streaming: महापरिनिर्वाण दिनानिमित्त घरबसल्या करा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; 'या' ठिकाणी पाहू शकाल कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण)
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून महापरिनिर्वाणदिनी सकाळी 7.45 ते सकाळी 10 या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.