Maghi Ganesh Jayanti 2020:  गणेश जयंती निमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंंदिरातील गणेश जन्म सोहळा इथे पहा लाईव्ह
Maghi Ganesh Jayanti | Photo Credits: dagdushethganpati.com

माघी गणेशोत्सव 2020 मध्ये आज (28 जानेवारी) गणेश जयंतीचा (Ganesh Jayanti)  सोहळा साजरा होत आहे. पुराणानुसार माघ शुक्ल चतुर्थी दिवशी गणेश जन्म झाला आहे. त्यामुळे आजचा दिवस गणेशभक्तांसाठी खास आहे. देशभरातील गणेश मंदिरांमध्ये आज बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी आहे. पुणे शहरातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्येही (Dagdusheth Halwai Ganpati Temple) आज माघी गणेश जयंतीचं औचित्य साधून खास गणेश जन्म सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास या सोहळ्याला सुरूवार होणार आहे. दरम्यान आज हा श्रीगणेश सोहळा पाहण्यासाठी ज्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल अशा भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने खास सोय केली आहे. दगडूशेठ गणपतीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच युट्युब चॅनेलवर हा जन्म सोहळा लाईव्ह पाहण्याची सोय करण्यात आली आहे. Ganesh Jayanti 2020 Wishes: गणेश जयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा, ग्रीटिंग्स, Messages, GIFs,HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून गणेश भक्तांना द्या माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!

दगडूशेठ गणपती मंदिरात भगवान श्री गणेशाच्या परिवार देवता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला शनिवार ( 25 जानेवारी) च्या सकाळी म्हणजे माघ शुक्ल प्रतिपदेपासून सुरूवात झाली आहे. त्यानंतर मंदिर परिसरात अथर्वशीर्ष पठण सह अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. इथे पहा यंदा दगडूशेठ गणपती मंदिरामधील श्री गणेश गणपती सोहळा लाईव्ह!

गणेश जन्म सोहळा कार्यक्रम कसा असेल?

दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आज माघ शुक्ल चतुर्थी दिवशी गणेश जन्म सोहळा दुपारी 12 वाजता साजरा केला जाईल. त्यानंतर श्रींची नगर प्रदक्षिणा मिरवणूक संध्याकाळी 6 वाजता असेल. संध्याकाळी 8.30 वाजता गणपती बाप्पाची महाआरती होईल तर रात्री 10 ते पहाटे 3 या वेळेमध्ये श्रीगणेश जागर कार्यक्रम पार पडणार आहे.

गणेश मंदिरांमध्ये श्रीगणेश जन्मसोहळ्याची जशी धामधूम असते तशीच ती घरगुती गणेशोत्सवमध्येही पहायला मिळते. गणेश मंदिरांसोबतच महाराष्ट्रामध्ये माघी शुक्ल चतुर्थी दिवशी घरी गणपतीची मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याची प्रथा आहे. यानिमित्ताने घरामध्ये गणेशाचे पूजन केले जाते. दीड दिवसांनंतर गणपतीचं विसर्जन केले जाते.