Kartiki Ekadashi 2020 Messages | File Image

Kartiki Ekadashi 2020 Messages: एकादश्यांमध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादश्या महत्त्वाच्या मानल्या जातात. आषाढी एकादशीपासून चार्तुमास सुरु होतो. त्या दिवशी देव झोपतात. म्हणून तिला शयनी एकादशी म्हणतात. देव चातुर्मासानंतर कार्तिकी एकादशीला जागे होतात. त्यास प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. यंदा 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. कार्तिक एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांचा मोठा उत्साह असतो. मात्र यंदा कोविड-19 सावटामुळे मिरवणूका-पालख्या रद्द करण्यात आल्या आहे. परंतु, मंदिरं खुली असल्याने वारकरी संप्रदाय समाधानी आहे. यंदाच्या कार्तिकी एकादशी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images, SMS, WhatsApp Stickers फेसबुक(Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), व्हॉट्सअॅप (WhatsApp) या सोशल मीडिया माध्यमातून शेअर करा.

कार्तिकी एकादशी दिवशी देव उठतात. त्यामुळे त्या एकादशीस देवउठनी एकादशी असेही म्हणतात. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत देवाची पालखी, मिरवणुका काढल्या जातात. (Kartiki Ekadashi 2020 Date: यंदा कार्तिकी एकादशी 25 की 26 नोव्हेंबर नेमकी कधी साजरी होणार?)

कार्तिकी एकादशी 2020 शुभेच्छा!

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख

पाहीन श्रीमुख आवडीने

कार्तिकी एकादशी निमित्त

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

मनःपूर्वक शुभेच्छा!

Kartiki Ekadashi 2020 Messages | File Image

बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल

करावा विठ्ठल जीवभाव

कार्तिकी एकादशी निमित्त

हार्दिक शुभेच्छा!

Kartiki Ekadashi 2020 Messages | File Image

भक्तीच्या वाटेत गाव तुझे लागले

आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले

तुझा प्रेमाचा झरा असाच कायम वाहू दे

माझ्या माणसांना असेच सुखात राहू दे

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!

Kartiki Ekadashi 2020 Messages | File Image

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

कर कटावरी ठेऊनी

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!

Kartiki Ekadashi 2020 Messages | File Image

टाळ वाजे, मृदंग वाजे,वाजे हरीची वीणा ||

माऊली निघाले पंढरपूरा..,मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा ||

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!

Kartiki Ekadashi 2020 Messages | File Image

WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!

सण समारंभ, विशेष दिन यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन स्टिकर्स डाऊनलोड करा आणि आपल्या नातेवाईक,मित्रमंडळींसोबत शेअर करा.

नामस्मरण आणि भक्ती हा ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग भागवत धर्मात सांगितला आहे. त्यामुळे सर्व भेद विसरुन एकादशीला वारीनिमित्त अनेक लोक एकत्र येतात आणि विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरला जातात. तुकाराम, नामदेव, जनाबाई आदी संतांनी विठठ्लभक्तीचे महत्त्व लोकांना पटवून दिले. तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये विठ्ठलभक्तीची परंपरा चालू आहे आणि ती अद्याप अखंड आहे.