छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात शिवजयंती (Shiv Jayanti) उत्सव म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात सरकार कडून 19 फेब्रुवारी दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेबद्दल इतिहासकारकांमध्ये मतमतांतर आहेत. त्यामुळे अन्य संभाव्य शिव जयंतीच्या तारखेमध्ये येणारा दिवस म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया! यंदा या तिथीनुसार 10 मे दिवशी काही शिवभक्त शिवजयंती साजरी करणार आहेत. त्यामुळे तुम्हांलाही तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना शिवाजयंतीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर खाली दिलेली शुभेच्छापत्र तुम्ही नक्कीच डाऊनलोड करून WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Greetings, Images द्वारा शेअर करून शिवरायांना मानाचा मुजरा करू शकता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शहाजी राजे आणि माता जिजाऊ यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्यावर लहानपणापासून साहसी कथांचे संस्कार झाले. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या दिशेने शिवरायांची जडणघडण सुरू झाली आणि मूठभर मावळ्यांच्या साथीने त्यांनी मराठा साम्राज्य उभं केलं. नक्की वाचा: शिवजयंती 19 फेब्रुवारी दिवशी साजरा करण्याचा इतिहास व महत्त्व काय?
शिवजयंतीच्या शुभेच्छा
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी उभारलेलं साम्राज्य केवळ प्रशासकांना नव्हे तर महाराष्ट्रातील सामन्य जनतेला देखील आदर्श घालून देते. त्यामुळे आज 350 वर्षांनंतरही महाराजांचं गारूढ प्रत्येकाच्या मनात आहे. मग अशा या थोर युगपुरूषाला आज त्याच्या जन्मदिनी स्मरणात ठेवत एक मानाचा मुजरा नक्की करा. शिवरायांवर आधारित आज अनेक पोवाडे, सिनेमे, नाट्यकलाकृती सामान्य जनतेपर्यंत त्यांचं कार्य पोहचवण्याचं काम करत आहेत.