Shivaji Maharaj Jayanti (Photo Credits: Wikimedia Commons)

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Tithi 2020:  महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेबद्दल इतिकास जाणकार, शिवभक्तांमध्ये अनेक मतभेद आहेत. मात्र ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये लिहण्यात आलेल्या मजकुरानुसार शिवाजी महाराजांचा जन्म दिवस (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) हा ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारी 1630 दिवशी झाला आहे. तर हिंदू दिनदर्शिकेनुसार, शिवजन्म हा फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 दिवशी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह जगभरात पसरलेले शिवभक्त दरवर्षी इंग्रजी कॅलेंडरनुसार, 19 फेब्रुवारी हा दिवस शिव जयंती (Shiv Jayanti) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य सरकार कडून देखील 19 फेब्रुवारी या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर केली जाते. Shiv Jayanti 2020 Status: शिव जयंती उत्सवापूर्वीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत हे Tik Tok Videos.  

शिवाजी महाराजांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी विविध संस्था आणि सरकार कडून पुढे शिवजयंतीचा उत्सव सार्वजनिक आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याला सुरूवात झाली. या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामधून त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. तर साहसी कथा सांगून त्यांचे विचार रूजवण्याचे प्रयत्न केले जाते.

शिव जयंती उत्सवाचा इतिहास

1869 साली जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यांच्या जीवनावर पहिला पोवाडा रचला. शिवाजी महाराजांचे कार्य सामान्यांच्या घरात पोहचावे यासाठी फुलेंनी 1870 साली पहिली शिवजयंती साजरी केली. हा शिवजयंतीचा कार्यक्रम पुण्यात पार पडला. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम सुरू केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली. शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे ते 2 वेळेस अध्यक्षदेखील होते.

यंदा देखिल 19 फेब्रुवारी दिवशी शिव जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी भारतासोबतच परदेशामध्येही शिवभक्त तयारीला लागले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच शालेय स्तरापासून शासकीय स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.