
जगभरात 6 जुलै हा दिवस इंटरनॅशनल किसिंग डे (International Kissing Day) म्हणून साजरा केला जातो. प्रेम व्यक्त करण्याचं एक माध्यम म्हणजे किस. केवळ प्रेमी युगुलांमध्ये किस प्रेम व्यक्त करते असे नाही तर पालक आणि पाल्यामधील नातं देखील 'किस' (Kiss) मधून अधिक वृद्धिंगत केले जाते. अनेकदा जेव्हा मनातील भावना बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतात तेव्हा 'किस' मनातील अनेक भावना मोकळेपणाने समोरच्यापर्यंत पोहचवल्या जातात. आजचा इंटरनॅशनल किसिंग डे च्या निमित्ताने तुम्हा आणि तुमच्या प्रियजणांच्या मधील नातं दृढ करण्यासाठी खास दिवस आहे त्यामुळे हा दिवस अधिक स्पेशल करण्यासाठी लेटेस्टली टीम कडून शेअर करण्यात आलेली ही खास ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, HD Wallpapers शेअर करून आजचा हा दिवस स्पेशल करायला विसरू नका.
दरम्यान 6 जुलैला इंटरनॅशंल किसिंग डे साजरा करण्यामागे प्रेम करणार्या दोन व्यक्तींना जवळ आणणं हा उद्देश होता. किस हे केवळ शारिरीक आकर्षणाचा भाग नाही तर त्यामागे मानवी दृष्टीने एकमेकांना जवळ आणणं असा देखील आहे. या दिवशी दुसर्या विश्व युद्धाची सुरूवात झाली होती त्यामुळे त्याचे देखील स्मरण केले जाते. नक्की वाचा: 'फ्रेंच किस' पासून 'स्लॉपी स्मूच' पर्यंत चुंबनाचे विविध प्रकार आणि त्यामागे दडलेला अर्थ जाणून घ्या.
इंटरनॅशनल किसिंग डे 2021






तुमच्या जवळच्या व्यक्तींमध्ये प्रेम कायम राहो आणि दिवसागणिक ते वाढो या ईच्छेमधून नक्कीच आजचा दिवस खास आहे. वैज्ञानिक दृष्ट्या किस मुळे तुमचं केवळ हृद्य नव्हे तर डोकं देखील शांत राहतं. ताण-तणाव कमी होतो. किसिंग मुळे मेंदुमध्ये केमिकल रिअॅक्शन होते. यादरम्यान oxytocin हार्मोन ला चालना मिळते. याला लव हार्मोन देखील म्हणतात. या हार्मोनमुळे जवळीक आणि प्रेमाची भावना वाढते.