जोडप्यांमधील नातं अजून घट्ट करण्यासाठी न केवळ प्रेमाची (Love) गरज असते तर ते प्रेम व्यक्त करण्यासाठी चुंबनाची ही गरज असते. ज्याला आपण इंग्रजीत 'Kiss' असे म्हणतात. त्यामुळे चुंबनाची खास आठवण म्हणून जगभरात 6 जुलै हा दिवस 'जागतिक किसिंग दिवस' (International Kissing Day) म्हणून साजरा केला जातो. या चुंबनाचे अनेक प्रकार आहेत किंबहुना या प्रत्येक चुंबनामागे काही अर्थ दडलेला आहे. चुंबनातून न केवळ आपल्या जोडीदारावरील (Couple) प्रेम व्यक्त होतं तर त्यामागील भावना देखील व्यक्त होतात. फ्रेंच किस पासून स्लॉपी स्मूच पर्यंत चुंबनाचे अनेक प्रकार आहेत.
या प्रकारांविषयी कदाचित काही जणांना माहितीही असेल मात्र त्यामागे दडलेला अर्थ मात्र अनेकांना माहिती नसावा. म्हणूनच आज जागतिक किसिंग डे च्या निमित्ताने जाणून घ्या चुंबनाचे प्रकार आणि त्यामागे दडलेला अर्थ:
1. फ्रेंच किस (French Kiss)
हा किस फोरप्ले करताना अनेकदा वापरला जातो. यात एकमेकांच्या जिभेचा संपर्क जास्त येतो. ज्याचा अर्थ आहे की, तुम्हाला किसपेक्षाही जास्त गोष्टी हव्या आहेत.
2. स्लॉपी स्मूचेस (Sloppy Smooches)
हा किस सेक्स च्या सुरुवातील अनपेक्षितपणे केला जातो. तसेच सेक्सचा शेवट करताना हा किस करतात.Sex Tips: French Kiss करताना 'या' गोष्टी ध्यानात ठेवल्यास शरीरास होतील फायदे
3. चाव्यासोबत किस (Kiss With Bites)
तुम्हाला सेक्सचा परमोच्च आनंद घ्यायचाय वा त्याची तीव्र इच्छा होतेय अशा वेळी हा किस केला जातो.
4. चुंबन खाणे (Devouring Kisses)
सेक्सची तीव्र इच्छा दर्शविण्यासाठी हा किस केला जातो. जोडप्यांना या चुंबनातून असं दाखवायचे असते की उद्याचा विचार न करता जे काही करायचे आहे ते आजच करायचे आहे.
5. ओठ बंद करुन किस करणे ( Lip Shut Kiss)
जर तुम्हाला किस करण्यात इंटरेस्ट नसेल मात्र तुम्हाला तुमच्या पार्टनरला नाराज करायचे नसेल तर हे किस केले जाते.
6. किस थांबवून ठेवणे (Kiss and Hold)
जेव्हा तुम्हाला चुंबनाचा तो अनुभव ती भावना रोखून ठेवायची असेल तेव्हा हा किस केला जातो.
7. कपाळावर किस करणे (Forehead Kiss)
जेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराबाबत काळजी वाटते किंवा त्याच्यावरचे प्रेम व्यक्त करायचे असेल तेव्हा कपाळावार किस केले जाते.
खरे पाहता चुंबन घेण्यामागे प्रेम ही एकच भावना असते. नकळत पणे केलेले चुंबन हे देखील खूप खास आणि रोमांचित करणारे असते. त्यामुळे त्यामागची भावना समजून गेणे गरजेचे आहे.