International Friendship Day Wishes| File Photo

Happy  International Friendship Day 2022 Wishes:  मित्रमंडळी म्हणजे आपण स्वतः निवडलेली परिवारातली मंडळी असतात. त्यामुळे त्यांना जपण्यासाठी थोडी विशेष मेहनत घ्या. ज्यांच्या आयुष्यात संकटसमयी पाठीशी उभी राहतील अशी मित्रमंडळी आहेत ते जगात सर्वात जास्त श्रीमंत आहेत. मग ही श्रीमंती जपण्याचा एक स्पेशल दिवस म्हणजे International Friendship Day.दरवर्षी जागतिक मैत्री दिन हा 30 जुलै दिवशी साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने तुमच्या मित्रमंडळींसोबत असलेला स्पेशल बॉन्ड अधिक घट्ट करण्याची संधी तुमच्याकडे असते. मग यंदा जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages, Wishes, Greetings द्वारा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.

2011 साली संयुक्त राष्ट्र च्या बैठकीमध्ये दोन लोकांमधील, संस्कृती मधील, देशांमधील मैत्रीचं नातं वाढवण्यासाठी, अधिक दृढ करण्यासाठी या दिवसाच्या सेलिब्रेशनची सुरूवात झाली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर International Friendship Day हा 30 जुलैला साजरा केला जातो तर भारतात ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा 'फ्रेंडशीप डे' म्हणून साजरा केला जातो. नक्की वाचा: International Friendship Day 2022 Date: आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस कधी आहे? इंटरनेशनल फ्रेंडशिप डे चा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या.

जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

International Friendship Day Wishes| File Photo

मैत्री खास लोकांसोबत होत नाही

पण ज्यांच्यासोबत होते ते खास होतात!

हॅप्पी इंटरनॅशनल फ्रेंडशीप डे!

International Friendship Day Wishes| File Photo

जागतिक मैत्री दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा!

International Friendship Day Wishes| File Photo

शत्रूला हजार संधी द्या मित्र बनण्यासाठी

पण मित्राला एकही संधी देऊ नका शत्रू बनण्यासाठी

International Friendship Day च्या शुभेच्छा!

International Friendship Day Wishes| File Photo

'मैत्री'ची वेगळीच असते जाणीव

भरून काढते अनेक  नात्यांची उणीव

जागतिक मैत्री दिन 2022 च्या शुभेच्छा!

International Friendship Day Wishes| File Photo

मैत्री हा विचित्र खेळ आहे

दोघांनी तो खेळताना

एक बाद झाला तरी

दुसर्‍याने तो सांभाळायचा असतो!

इंटरनॅशनल फ्रेंडशीप डे 2022च्या शुभेच्छा!

जागतिक मैत्री दिन यंदा विकेंडला अर्थात शनिवारी आल्याने तुमच्या मित्रमंडळींसोबत हा साजरा करण्यासाठी बाहेर फिरायला जाऊ शकता. या निमित्ताने एकत्र धम्माल मस्ती करत तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा दिवस थोडा स्पेशल करत साजरा करू शकता.