International Friendship Day 2022 Date: आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस कधी आहे? इंटरनेशनल फ्रेंडशिप डे चा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या
Friendship-day 2022

International Friendship Day 2022:आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे जवळ आला आहे. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारे सुरु केलेला मैत्री दिन, जगभरातील लोकांमध्ये मैत्री आणि सहकार्याच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 30 जुलै रोजी साजरा केला जातो. मित्रा प्रती मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करणे महत्वाचे मानले जाते. म्हणून, जर तुम्ही इंटरनेशनल फ्रेंडशिप डे संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन 2022 ची तारीख, महत्त्व आणि इतिहास याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा.हे देखील वाचा  : Deep Amavasya 2022 Date: दीप अमावस्या यंदा 28 जुलै दिवशी जाणून घ्या दीप पूजेचे महत्त्व!]

आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस कधी आहे?

आंतरराष्ट्रीय मैत्री दिन किंवा जागतिक मैत्री दिन 2022 30 जुलै, शनिवारी रोजी आहे. मैत्री या नात्याला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आणि उपक्रम या दिवशी आयोजित केले जातात. मैत्रीचा सुंदर दिवस साजरा करण्यासाठी UN ने 30 जुलै हा दिवस निवडला. दरम्यान, भारतात फ्रेंडशिप डे ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. तर, फ्रेंडशिप डे 2022 7 ऑगस्ट रोजी भारतात साजरा केला जाईल.

आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाचा इतिहास आणि महत्त्व

2011 मध्ये आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्यास सुरुवात झाली, जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी लोकांच्या मनात असलेली मैत्रीची भावना आणि त्याचे महत्त्व आणखी मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करून महत्वाचे पाऊल उचलले. गरिबी, दारिद्र्य, प्रदूषण, बेरोजगारी, भूक आणि रोगराई यांनी ग्रासलेल्या समस्याग्रस्त परिस्थितीमध्ये लोकांनी भेदभाव विसरून मैत्री दिन साजरे करावे अशी संस्थेची इच्छा होती. ग्रस्त असलेल्या समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक असले तरी, एकजूटीची भावना निर्माण व्हावी म्हणून फ्रेंडशिप डे साजरा केला जातो

आंतरराष्ट्रीय मैत्री दिन हा एक उपक्रम आहे जो UNESCO ने भेदभाव दूर व्हावा या भावनेने सुरु केला आहे. जगभरात आनंद आणि एकतेचा संदेश देण्यासाठी एक उपाय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. फ्रेंडशिप डेच्या दिवशी, लोक त्यांच्या मित्रांना भेटून, पार्टी करून फ्रेंडशिप डे साजरा करतात. मैत्रीच्या नात्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हा दिवस स्मरणीय तसेच विशेष बनवण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तुम्हीही तुमच्या घनिष्ट सख्या सोबत मैत्री दिन साजरा करा. तुम्हालाही आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा