Independence Day 2021 Rangoli Design: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त काढा 'या' सोप्या आणि आकर्षक कलरफुल रांगोळी डिझाईन
Independence Day 2021 Rangoli Design ( Photo: YouTube)

भारतात अनेक ठिकाणी 75 व्या स्वातंत्र्यदिनासाठी तयारी सुरु झाली आहे. स्वातंत्र्यदिन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे कोरोना व्हायरसमुळे उत्सव नेहमीप्रमाणे मोठ्या पद्धतीने जरी साजरा होणार नसला तरी या दिवशी प्रत्येक भारतीयांचा उत्साह कमी होणार नाही. या दिवशी लोक तिरंग्याच्या रंगांचे कपडे घालतात, मेक अप करतात,किंवा तिरंग्याच्या कलरचे केस ही रंगवतात. हा दिवस भारतीयांसाठी कोणत्या सणापेक्षा कमी नाही. या दिवशी दारापुढे किंवा जिथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा होणार आहे त्या ठिकाणी सुंदर रांगोळी ही काढली जाते. तुम्ही ही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रांगोळी काढण्याच्या विचारात असाल आणि डिझाइन शोधत असाल तर आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास स्वातंत्र्य दिनानिमित्त काढता येतील अशा सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन. (Independence Day 2021: स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महापालिकेच्या इमारतीला तिरंग्याची रोषणाई)

बांगड्यांच्या सहाय्याने काढता येणारी स्वातंत्र्य दिन स्पेशल रांगोळी

कंगव्याचा वापर करुन रांगोळी डिझाइन

स्वातंत्र्य दिन स्पेशल फुलांची रांगोळी

स्वातंत्र्य दिन स्पेशल क्रिएटिव रांगोळी

यंदा कोरोना व्हायरसमुळे स्वातंत्र्यदिनी बाहेर जाऊन उत्साहात हा दिवस साजरा करणे कठीण आहे. पण घरातल्या घरात ही आपण हा दिवस छान सेलिब्रेट करू शकता. तेव्हा यंदा या रांगोळी डिझाईन नक्की ट्राय करा. आपल्या सर्वांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!