Human Rights Day (Photo Credits: Pixabay)

Human Rights Day 2018  : 10 डिसेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन (Human Rights Day ) म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राने (UN)  1948 साली हा दिवस मानवाधिकार दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. जगभरातील लोकांचे मानवाच्या अधिकारांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी या दिवसाचे खास महत्त्व आहे. भारतामध्ये 28 सप्टेंबर 1993 साली मानवाधिकार कायदा बनवण्यात आला. त्यानंतर 12ऑक्टोबर 1993 साली राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली.

मानवाधिकाराखाली जगभरातील कोणत्याही व्यक्तीला जात, धर्म, राष्ट्रीयता, धर्म, लिंग यामुळे कोणाचे अधिकार हिरावून घेतले जाणार नाहीत याची काळजी घेतली जाते. जन्मतः सार्‍यांना स्वातंत्र्य आणि समानता मिळवून देण्यासाठी मानवाधिकार मदत करतात.

भारतामध्ये बालमजुरी, आरोग्य, बालविवाह, महिलाअधिकार, अल्पसंख्यांक आणि अनुसुचित जाती,जमातीच्या आधारावर विभागलं जातं. यंदा मानवाधिकार दिवसाचं 70 व्या वर्षात पदार्पण झालं आहे. संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार कार्यालयाच्या (UNHRO) नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जातो.

1966 साली संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये 'मानवी हक्कांचं आंतरराष्ट्रीय विधेयक मांडण्यात आलं. दहा वर्षांनी पुरेशा सदस्य राष्ट्रांच्या पाठिंब्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचं स्वरुप देण्यात आलं. जगात पहिल्यांदा 48 राष्ट्रांनी हा दिवस साजरा केला.