Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रेसाठी कसे पोहचाल?
Anganewadi Bharadi Devi Jatra 2019 Special Train ((Archived, Edited, Representative images))

Anganewadi Bharadi Devi Jatra Route: नवसाला पावणारी देवी म्हणून मान असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची (Anganewadi Bharadi Devi) जत्रा यंदा 25 फेब्रुवारी ला भरणार आहे. कोकणवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या या तीर्थक्षेत्री जत्रेनिमित्त तुफान गर्दी होते. सामान्यांपासून ते राजकीय नेते, कलाकार मंडळींपर्यंत अनेकजण जत्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीला भोपळ्याच्या वड्यांचा प्रसाद , 'ताट लावणं' प्रथा म्हणजे काय?

सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात ही दीड दिवसांची जत्रा भरते. या जत्रेला जाण्याची तुमची देखील इच्छा असेल तर तुम्ही या सोप्या मार्गांचा  अवलंब करु शकता.

भराडी देवीच्या यात्रेला कसे पोहचाल?

आंगणेवाडीच्या जत्रेला तुम्ही रेल्वे किंवा बस या दोन्ही मार्गांनी पोहचू शकता. दीड दिवसांच्या या यात्रेला पहाटेपासून सुरुवात होते. त्यासाठी तुम्ही एक दिवसापूर्वीच बस किंवा रेल्वेने तिथे पोहचू शकता. आंगणेवाडी 2019 यात्रेसाठी मध्य रेल्वे चालवणार आज रात्री विशेष अनारक्षित गाडी, पहा वेळ आणि कुठल्या स्थानकांवर थांबणार

आंगणेवाडीला पोहचण्यासाठी तुम्हाला कोकण रेल्वेच्या रत्नागिरी किंवा कणकवली या दोन स्थानकांपैकी एका स्थानकावर उतरावे लागेल.

रत्नागिरी स्टेशनला उतरल्यास

रत्नागिरी स्टेशनवरुन तुम्हाला रत्नागिरी बस डेपोत जावे लागेल. यासाठी तुम्हाला एसीटी बस किंवा रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. रत्नागिरी एसटी डेपोमध्ये पोहचल्यानंतर आंगणेवाडीला जाण्यासाठी तिथून दर अर्ध्या तासाने एसटी बसेस उपलब्ध आहेत. या बसेस जत्रेच्या दोन्ही दिवशी पहाटे 5 वाजल्यापासून सुरु होतात आणि त्याचप्रमाणे आंगणेवाडीहून रत्नागिरीला परतण्यासाठी दर एका तासाने बसेस उपलब्ध आहेत.

कणकवली स्टेशनवरुन कसे जाल?

कणकवली स्टेशनपासून कणकवली डेपोपर्यंत जाण्यासाठी शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. कणकवली बस डेपोतून आंगणेवाडीला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाने बसेस आहेत. दोन्ही बस डेपोपासून आंगणेवाडीपर्यंत एसटीच्या तिकीटाचा दर अगदी माफक आहे.

बसने प्रवास करणार असल्यास

बसने प्रवास करणार असाल तर प्रायव्हेट किंवा एसी महामंडळाच्या बसने रत्नागिरी किंवा कणकवलीपर्यंत जावू शकता. या बसेस तुम्हाला रत्नागिरी किंवा कणकवलीपर्यंत सोडतील. तिथून पुढे तुम्ही एसटी महामंडळाच्या बसेसने आंगणेवाडीपर्यंत पोहचू शकता.

स्वतःच्या वाहनाने जायचे असल्यास

जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने प्रवास करणार असाल तर पुणे-कोल्हापूर मार्गे तुम्ही कणकवलीपर्यंत जावू शकता आणि त्यानंतर आंगणेवाडीपर्यंतचा पुढचा प्रवास करता येईल. पुणे-कोल्हापूर मार्गाव्यतिरिक्त तुम्ही मुंबई-गोवा महामार्गाचाही वापर करु शकता.