Sankashti Chaturthi 2025: माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. या दिवशी गणेश भक्त पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने हे व्रत पाळतात. या वर्षी हे व्रत शुक्रवार, 17 जानेवारी रोजी पाळले जाईल. या दिवशी भक्त सकाळी तिळाच्या पाण्याने स्नान करून संध्याकाळी विधीनुसार गणपतीची पूजा करतात आणि व्रतकथा वाचतात. यानंतर, ते चंद्रोदयाची वाट पाहून नंतर चंद्राला पाणी अर्पण करून उपवास सोडतात. या व्रताला काही ठिकाणी तिलवा आणि तिलकूट चतुर्थी असे म्हणतात. आज आपण संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्त्व, पूजेची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊयात...
संकष्टी चतुर्थी व्रत तारीख -
उदयतिथीनुसार, संकष्टी चतुर्थीचे व्रत 17 जानेवारी 2025 रोजी आहे. या दिवशी भक्तगण गणपतीची पूजा करतात. संकष्टी चतुर्थीची तारीख 17 जानेवारी रोजी पहाटे 4:06 वाजता सुरू होईल. त्यामुळे हे व्रत उदयतिथीनुसार 17 जानेवारी रोजी पाळण्यात येईल.
संकष्टी चतुर्थीचे महत्त्व -
संकष्टी चतुर्थीला संकटे दूर करणारी चतुर्थी, असंही म्हणतात. हे व्रत भगवान गणेशाला समर्पित आहे. या दिवशी महिला आपल्या मुलांच्या आनंदासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निर्जल उपवास करतात. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी गणरायाची पूजा केली जाते. असेही मानले जाते की, हे व्रत केल्याने तुमच्या मुलांना त्यांच्या कारकिर्दीत आणि प्रगतीत मोठे यश मिळते.
संकष्टी चतुर्थी पूजाविधी -
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. स्वच्छ आणि पिवळे कपडे घालावेत. गणपतीचे ध्यान करावे आणि उपवास करण्याचे व्रत करावे. गणेशाची मूर्ती किंवा चित्र पाटावर हिरव्या किंवा लाल रंगाचे कापड अंथरून त्यावर ठेवा. गणपतीला गुलाल, फुले, फळे, मिठाई, दुर्वा आणि तीळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करा. संकष्टी चतुर्थी व्रत कथा वाचा आणि गणपतीची आरती करा. सर्वांना प्रसाद द्या. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते.
संकष्टी चतुर्थी चंद्रोदयाची वेळ -
संकष्टी चतुर्थी व्रताच्या दिवशी रात्री 9:09 वाजता चंद्रोदय होईल. या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करून त्याची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की, या वेळी पूजा केल्याने भक्तांना चंद्राचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या मुलांना दीर्घायुष्य मिळते.