राम नवमी हा दिवस भगवान राम जन्माला आले तो दिवस आहे या दिवशी उत्सवसाजरा केला जातो . यंदा राम नवमीचा शुभ दिवस 21 एप्रिल रोजी आहे.भगावान श्रीरामांचा जन्म सूर्यवंशी इश्वांकू कुळामध्ये झाला होता. अयोद्धेच्या प्रजेसाठी ते राजे होते. हिंदू पुराणकथांनुसार भगवान श्रीराम हा विष्णू (Lord Vishnu) यांचा सातवा अवतार होता. चैत्र महिन्यात पहिले नऊ दिवस हे माता दुर्गेसाठी समर्पित केलेले असतात. त्यामुळे या काळात चैत्र नवरात्र साजरी केली आहे. या नवरात्रीच्या समाप्तीला राम नवमीचा सण असतो. हे ही वाचा (Ram Navami 2021: राम नवमीचा उपवास करण्यापूर्वी 'ही' महत्वाची माहिती नक्की जाणून घ्या )
राम नवमी तारीख वेळ, तिथी
राम नवमी यंदा बुधवार, 21 एप्रिल 2021 दिवशी साजरी केली जाईल. नवमीची तिथी यंदा 21एप्रिलला 12:43 AM पासून 22 एप्रिलच्या 12:35 AM पर्यंत आहे. धार्मिक कथांनुसार रामाचा जन्म हा मध्यान्हाला झाला असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे राम मंदिर आणि घराघरामध्ये दुपारी 12 च्या सुमारास प्रतिकात्मक स्वरूपात रामाचा पाळणा गात राम जन्मोत्सव साजरा करतात.
आपण घरी राम नवमी कशी साजरी करू शकता ते पाहूयात
घरात एक छान जागा किंवा घरातले मंदिर स्वच्छ करा. रामा नवमीच्या वेळी भगवान राम हा मुख्य देवता आहे, म्हणून भगवान रामांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. भगवान रामसमवेत माता कौशल्या, राजा दशरथ, सीता आणि भगवान राम यांचे तीन धाकटे बंधू - भरता, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचीही पूजा केली जाते. हनुमान जी, भगवान राम यांचे सर्वात मोठे भक्त त्यामुळे या शुभ दिनी त्यांनाही पुजले जाते .कुटुंबातील सर्व सदस्यांना राम नवमी पूजेमध्ये सामील करा. परंपरेने कुटुंबातील तरूण मुली कुटुंबातील सर्वांच्या कपाळावर टीका लावतात . (Ram Navami 2021 Message: श्री राम नवमीच्या दिवशी खास मराठी Images, HD Wallpaper, WhatsApp, Facebook Status, Wishes शेअर करून द्या प्रभू राम जन्मदिनाच्या शुभेच्छा ) गंगा जल, रोली आणि ऐपुन देवांवर शिंपडले जातात आणि त्यानंतर राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान जी यांच्या देवता किंवा फोटोवर तांदूळ चढवले जातात.तुळशीची पाने व फुले अर्पण करा.तसेच देवाला फळ अर्पण करा.भगवान श्री राम यांना दूध, दही, तूप, मध, साखर मिसळून पंचमृत आणि भोग दिला जातो. त्यानंतर सर्वजण आरती करतात आणि भजनही गायले जाते. शेवटी, कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रसाद वाटप केले जाते. या राम नवमीवर भगवान रामची कथा सांगणारी तुळशी रामायण पाठ करा. काही घरात अखंड रामायण पाठ किंवा तुळशीदासांचा संपूर्ण रामचरितमानस जप 24 तास केला जातो.