प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Holi 2019: होळी हा रंगांचा उत्सव आहे. तसेच भारतात होळीचा सण आनंदाने साजरा केला जातो. परंतु सध्या स्मार्टफोन आल्यानंतर होळीच्या सणात वेगळेपण आले आहे. आता लोकांना होळी खेळत असताना स्मार्टफोनचीच जास्त काळजी लागून राहिलेली असते. यापूर्वी लोक मोकळेपणाने होळी खेळताना दिसून यायचे.

होळीच्या वेळी तुम्ही जर फोनची काळजी घेतली नाही तर तुमचा स्मार्टफोनमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या होळीवेळी स्मार्टफोन रंगांपासून दूर ठेवण्यासाठी या सोप्या ट्रिक्स वापरा.

झिप लॉक बॅग:

होळीच्या वेळी रंगांपासून स्मार्टफोनचा बचाव करण्यासाठी झिप लॉक बॅग हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन सुरक्षित राहील आणि पाणीसुद्धा जाण्याची चिंता सतावणार नाही.

हँन्ड फ्री:

जर तुम्ही मित्र-मैत्रीणींसह रंगांची उधळण करत असल्यास आणि वारंवार फोन येत असेल तर हँन्ड फ्रीचा उपयोग करा. यामुळे तुम्हाला फोन उचलण्यासाठी फोन बाहेर काढावा लागणार नाही.(हेही वाचा-Holi 2019: होळी, रंगपंचमी सणांमध्ये रंगाचा आनंद लूटताना केसांचे आणि त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी खास टिप्स!)

वॉटरप्रुफ कवर:

जर तुमच्याकडे महागडा स्मार्टफोन असल्यास होळीच्या वेळी रंगांपासून त्याचा बचाव करण्यासाठी जरुर लक्ष द्या. तर वॉटरप्रुफ कवरचा उपयोग करुन तुम्ही स्मार्टफोन व्यस्थित ठेऊ शकता. तसेच प्रत्येक वॉटरप्रुफ कवरची किंमत त्याच्या बदलत्या कंपनीनुसार वेगवेगळी असते.

फुग्याचा वापर करा:

फुग्याचा वापर करुन तुम्ही स्मार्टफोन सुरक्षित ठेवू शकता. फुगा फुगवून त्यात तुम्हाला फक्त स्मार्टफोन ठेवायचा आहे. त्यामुळे पाणी आणि रंगांपासून स्मार्टफोन दूर ठेवण्यासाठी हा उपाय अगदी सोपा आहे. (हेही वाचा-Happy Holi 2019: होळी, रंगपंचमी साठी नैसर्गिक रंग घरच्या घरी कसे बनवाल?)

अशा प्रकारे सोप्या ट्रिक्सचा वापर करुन यंदाची होळी आनंदात साजरी करा. तसेच होळीच्या सणानिमित्त गालबोट लागू नये याची काळजी घेऊन रंगांची उधळण करा.