सणवार, व्रत वैकल्यांची रेलचेल असणारा महिना म्हणजे श्रावण महिना(Shravan Month) .पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरण, निसर्गात पुन्हा बहरलेली हिरवळ, खळाळणारे झरे यांच्यासोबत श्रावण महिना अनेक व्रतवकल्यांनी सजलेला असतो त्यामुळे सहाजिकच हा महिना अधिक उत्साहपूर्ण असतो. यंदाच्या वर्षी या श्रावण महिन्याचा उत्साह तब्बल 59 दिवस असणार आहे. अधिक मासातही श्रावण असल्याने यंदा 18 जुलै पासून अधिक मासातील श्रावण आणि नंतर नीज श्रावण साजारा केला जाणार आहे. मग अशा या पवित्र हिंदू महिन्याच्या शुभेच्छा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना देऊन हा महिना अधिक खास करायला विसरू नका.
श्रावण महिन्यात नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला असे सण वार साजरे केले जातात. यानिमित्ताने मैत्रिणींचा, आप्तेष्टांचा गोतावळा भेटतो. नक्की वाचा: Shravan Month Mangalagauri: श्रावण महिन्यातील मंगळागौरीचे व्रत तीथी आणि या व्रताची पूजाविधीचे विशेष महत्त्व, जाणून घ्या .
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
हिंदू धर्मियांसाठी पवित्र महिना
श्रावण मासाच्या पहिल्या दिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण
फुल फुलात उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नटली सृष्टी बदलली दृष्टी, आनंद मावेना मनात
हासत, नाचत, गात-गात श्रावण आला अंगणात
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
हासरा नाचरा जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला
श्रावण मासारंभ !
कडाक्याच्या उन्हाळ्यात सुकलेली वनराई श्रावण महिन्यात पुन्हा बहरलेली दिसते. त्यामुळे जसा निसर्गात उत्साह असतो तसा श्रावण महिना विविध सणवारांचा आनंद घेऊन आपल्या आयुष्यात रंग भरतो. ऋतुमानातील हा बदल स्वीकारत आहारात बदल करण्याची शिकवण देखील हा महिना देतो. या काळात पचनशक्ती मंदावलेली असते त्यामुळे मांसाहार, मद्यापान टाळण्याचा सल्ला व्रत वैकल्यांच्या मागून दिला जातो. या महिन्यात त्यामुळेच अधिक उपवास देखील असतात ज्यामुळे सहाजिकच हलका आहार केला जातो.