
Ratha Saptami 2020 Wishes In Marathi: माघ शुक्ल सप्तमी दिवशी रथ सप्तमी (Ratha Saptami) साजरी केली जाते. यंदा 1 फेब्रुवारी दिवशी रथ सप्तमी साजरी केली जाणार आहे. हिंदू पुराण कथांनुसार सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो. या दिवशी सूर्याची उपासना करून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. मग यंदा तुमच्या सोबतच्या जवळची मंडळी, प्रियजण, नातेवाईकांना रथ सप्तामीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटिंग्स, संदेश, मराठमोळे मेसेजेस, HD Images, शुभेच्छापत्र देऊन रथसप्तमीच्या शुभेच्छा नक्की शेअर करा. Ratha Saptami 2020: यंदा 1 फेब्रुवारीला साजरी होणार 'रथ सप्तमी'; जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त, धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व.
रथ सप्तमीच्या शुभेच्छा





संक्रांतीनिमित्त असणार्या सवाष्ण महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाचा शेवट देखील रथ सप्तमी दिवशी होतो. हिंदू धर्मीयांच्या मते रथ सप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. त्यामुळे धकाधकीच्या बनत चाललेल्या आजच्या आयुष्यात तुमच्या आरोग्यासाठी थोडा वेळ राखीव ठेवायला आजपासून सुरूवात करा. ही रथ सप्तमी तुमच्यासह तुमच्या परिवारासाठी उत्तम स्वास्थ्य,दीर्घायुष्य घेऊन येवो हीच आमची कामना! लेटेस्टली मराठी कडून रथ सप्तमी 2020 च्या हार्दिक शुभेच्छा!