भगवान श्रीराम (Lord Shree Ram) यांचा जन्मदिवस राम नवमी म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार, भगवान विष्णूंचा अवतार श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी दिवशी झाला. त्यामुळे अयोद्धा नगरी सह सर्वत्र हिंदू बांधव राम नवमीचं औचित्य साधत हा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात. देशभर राम मंदिरात या निमित्ताने भाविकांची गर्दी असते. सोशल मीडीया मध्येही राम भक्तांना WhatsApp Messages, Status, Wishes, GIFs, Greetings द्वारा राम नवमीच्या शुभेच्छा शेअर करत या मंगलपर्वाचा आनंद द्विगुणित करा.
यंदा राम नवमी 30 मार्च दिवशी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने सर्वत्र राम मंदिरांमध्ये मोठा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. दुपारी 12 वाजता भगवान श्रीरामांचा जन्म अयोद्धा नगरी मध्ये झाला असं मानलं जातं त्यामुळे राम मंदिरामध्येही मध्यान्हावर राम जन्माचा पाळणा गायला जातो. नक्की वाचा: Ram Navami 2023: भगवान राम आणि राम जन्मोत्सवाबद्दल जाणून घ्या 'या' खास गोष्टी!
राम नवमीच्या शुभेच्छा
ज्यांच्या मनात श्रीराम आहे,
त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
चैत्रमास त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही,
वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला
आसमंत दुमदुमला सारा
हर्षित झाले नभांगण
रामनवमीचा दिन आजचा
आनंदले सारेजण
जल्लोषाला उधाण आलं
अयोद्धा सजली सारी
श्रीराम नवमीचा दिन आजचा
दुमदुमली सारी नगरी
वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर..
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर..
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
भगवान श्रीराम यांचा जन्म अयोद्धा नगरीचे राजा दशरथ आणि त्यांची पत्नी कौशल्या यांच्या पोटी झाला होता. भगवान राम हे भगवान विष्णू यांचा सातवा अवतार आहे असे मानले जाते. त्यांचा जन्म त्रेता युगामध्ये झाला असल्याने मानवी रूपामध्ये त्यांना पूजलं जातं आणि मानवी रूपात पुजली जाणारी ही पहिलीच देवता आहे.