Happy Propose Day 2024 Wishes: प्रपोझ डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages, Greetings द्वारा शेअर करत द्या प्रेमाची कबुली!
File Image

Valentine Week 2024:  व्हेंलेंटाईन वीक मध्ये दुसरा दिवस हा प्रपोझ डे (Propose Day) म्हणून साजरा केला जातो. 8 फेब्रुवारी दिवशी प्रपोझ डे साजरा करताना आपल्या प्रियकर/ प्रेयसी, साथीदाराला प्रपोझ करून त्याला मनातील भावना, प्रेम व्यक्त केले जातं. रिलेशनशीप मध्ये केवळ प्रेम असून चालत नाही ते योग्य वेळी समोरच्या व्यक्ती समोर व्यक्त देखील करावं लागतं. त्यासाठी मनातल्या भावना बोलून व्यक्त करण्यासाठी या खास मराठमोळ्या मेसेजेस, ग्रीटिंग्सचा तुम्ही वापर करू शकता. WhatsApp Messages, Status, Facebook, Instagram च्या माध्यमातून ही शुभेच्छापत्र, मेसेजेस पाठवून तुम्ही या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल.

व्हेलेंटाईन डे पूर्वी साजरे केले जाणारे प्रेमाचे सात खास दिवस असतात. अनेक अंदाजामध्ये तुम्ही तुमच्या मनातील भावना समोरच्या पर्यंत पोहचवू शकता.  Valentine Week 2024 Date Sheet: व्हॅलेंटाईन वीक पूर्वी Rose ते Kiss Day; प्रेम साजरं करण्यासाठी 7 दिवसाचं सेलिब्रेशन पहा कोणत्या दिवशी? 

प्रपोझ डे च्या शुभेच्छा

प्रेम प्रेम प्रेमाची साथ,

आता अजून काय मागू

तुझ्याशिवाय खास

हॅप्पी प्रपोझ डे

File Image

एक थेंब अळवावरचा,

मोत्याचं रुप घेऊन मिरवतो

एक थेंब तुझ्या ओठांवरचा

माझं जग मोत्यांनी सजवतो

हॅप्पी प्रपोझ डे

File Image

साथ मला देशील का? माझी तू होशील का?

आजच करतो प्रपोझ भाव तू मला देशील का?

File Image

तुझ्या एका हास्यासाठी

चंद्र सुद्धा जागतो

रात्रभर तिष्ठत  बिचारा

आभाळात थांबतो

Happy Propose Day!

File Image

लोक म्हणतात रिकाम्या हाताने आलात

रिकाम्या हाताने परतणार

असं कसं शक्य आहे,

जगात आलो आहे तर...

तुझं मन जिंकूनच राहणार

File Image

रोमॅन्टिक कन्फेशन असो किंवा आयुष्यभर एकत्र प्रवास करण्याची वचनबद्धता असो, प्रपोज डे लोकांना त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करण्यास एक कारण आहे. व्हेलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर या दिवसाला खास महत्त्वही आहे. प्रेम वाढवणे आणि संबंध अधिक दृढ करणे हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे सहाजिकच फेब्रुवारी महिना प्रेमात बुडालेल्या जोडप्यांसाठी स्पेशल असतो.