फेब्रुवारी महिना आला की प्रेमात बुडालेल्या तरूणाई मध्ये यंदाचा व्हेलेंटाईन डे (Valentine Day) खास करण्याचे वेध सुरू होतात. 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाईन डे साजरा करण्यापूर्वी आठवडाभर प्रेमाची साक्ष देण्यासाठी विविध दिवस साजरे केले जातात. व्हेलेंटाईन डे आणि त्यापूर्वीच्या आठवडाभराच्या सेलिब्रेशन मध्ये फुलं, चॉकलेट्स, गिफ्ट्स दिली जातात. मग यंदा तुम्हांलाही या सेलिब्रेशनचा भाग व्हायचं असेल तर जाणून घ्या व्हेलेंटाईन डे पूर्वी आठवडाभर केल्या जाणार्या सेलिब्रेशन मध्ये नेमका कोणता दिवस कधी आहे? त्यानुसार या स्पेशल लव्ह वीक ची तुम्ही देखील तयारी करू शकाल.
Valentine Week 2024 मध्ये कोणत्या दिवशी नेमकं काय?
Rose Day : 7 फेब्रुवारी (बुधवार)
व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस रोज डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना गुलाबाचं फुल देऊन प्रेम आणि काळजी व्यक्त करू शकता. वेगवेगळ्या रंगाचे गुलाब वेगवेगळ्या भावनांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून ज्याला गुलाब देणार आहात त्याला विचारपूर्वक द्या.
प्रपोज डे: 8 फेब्रुवारी (गुरूवार)
रोज डे नंतरचा दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या खास व्यक्तीला तुमचे प्रेम धैर्याने व्यक्त करू शकता.
चॉकलेट डे: फेब्रुवारी 9 (शुक्रवार)
व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जोडीदाराला आपल्या आवडीचे चॉकलेट देण्याची प्रथा आहे. या दिवशी, प्रेमळ जोडपे एकमेकांना चॉकलेट गुच्छे, चॉकलेट बास्केट विशिष्ट प्रकारे भेट देतात.
टेडी डे: 10 फेब्रुवारी (शनिवार)
टेडी डे म्हणजे व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस. जेव्हा लोक आपल्या जोडीदाराला टेडी बेअर देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.
प्रॉमिस डे : 11 फेब्रुवारी (रविवार)
प्रेमळ जोडपे व्हॅलेंटाईन वीकचा 5 वा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा करतात. या दिवशी ते आयुष्यभर प्रेम करण्याचे आणि एकत्र राहण्याचे वचन देतात. तसे, तुम्ही हा दिवस केवळ तुमच्या जोडीदारासोबतच नाही तर तुमच्या हृदयाच्या जवळ असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत साजरा करू शकता, मग ती तुमची आई, बहीण किंवा मित्र असो.
हग डे : 12 फेब्रुवारी (सोमवार)
व्हॅलेंटाईन वीकच्या 6 व्या दिवशी हग डे साजरा केला जातो. लोक एकमेकांना मिठी मारून प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात.
किस डे: 13 फेब्रुवारी (मंगळवार)
व्हॅलेंटाईन वीकचा 7 वा दिवस किस डे म्हणून 13 फेब्रुवारीला साजरा केला जातो.
व्हॅलेंटाईन डे: 14 फेब्रुवारी (बुधवार)
व्हॅलेंटाईन डे हा व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस म्हणजेच 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी प्रेमाच्या व्यक्तीसाठी आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या जातात. 'व्हेलेंटाईन डे' म्हणून 14 फेब्रुवारीला जगभरात प्रेमाचा दिवस साजरा करण्याचं 'हे' आहे महत्त्व आणि इतिहास.
व्हॅलेंटाईन डे कनेक्शन ख्रिस्ती धर्माशी आहे. पण आता धर्माच्या सीमा पार करून हा दिवस सारेच धर्मीय उत्साहाने साजरा करतात. आपल्या प्रिय व्यक्ती बद्दल प्रेम, आदर व्यक्त करण्याचा हा अजून एक खास मोका असतो त्यामुळे या दिवसाचं तरूणाई मध्ये विशेष आकर्षण आहे.