Valentine’s Day 2020 Significance: फेब्रुवारी महिन्याची सुरूवात झाली की प्रेमात असणार्या तरूण-तरूणींना 'व्हेलेंटाईन डे' (Valentine’s Day) चे वेध लागायला सुरूवात होते. 7 फेब्रुवारीला रोझ डे (Rose Day) पासून सुरू होणारा हा रोमॅन्टिक आठवडा 14 फेब्रुवारीला स्पेशल होतो. दरवर्षी 14 फेब्रुवारी दिवशी जगभरात 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वातावरणात असलेला थंडावा आणि सोबतीला रोमॅन्टिक आठवड्याभराचं सेलिब्रेशन असल्याने प्रेमवीरांसाठी हा आठवडा अजूनच खास होतो. प्रेमी तरूण तरूणी या आठवड्याभरात प्रत्येक एक दिवस साजरा करताना त्याच्या सेलिब्रेशनसोबतच एकमेकांना भेटवस्तू, शुभेच्छा देऊन व्हेलेंटाईन वीक मधील प्रत्येक दिवस खास करतात. मग जगभरात तरूणाईत क्रेझ असलेल्या 'व्हेलेंटाईन डे'ची नेमकी कशी सुरूवात झाली हे जाणून घेत साजरा करा यंदाचा प्रेमाचा दिवस म्हणजे व्हेलेंटाईन डे! Valentine Day 2020 Horoscope: कोणत्या राशींना यंदाचा व्हॅलेनटाईन डे असणार खास, जाणून घ्या तुमचे भविष्य.
'ऑरिया ऑफ जैकोबस डी वॉराजिन' या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या शतकात रोम देशात एक क्रुर सम्राट होता. जो प्रेम करणाऱ्या युगुलांवर अत्याचार करत असे. मात्र त्याच्या अत्याचाराला न जुमानता व्हेलेंटाईन नावाच्या एका संताने प्रेमाचा संदेश दिला. सम्राट क्लाऊडियसला निषेध करत संत व्हेलेंटाईन यांनी जोडप्यांचं लग्न लावलं. त्याच्या या कृत्यानिमित्त व्हेलेंटाईनला जेलमध्ये टाकण्यात आले आणि 14 फेब्रुवारी 270 साली त्याला फासावर लटकवण्यात आले. संत व्हेलेंटाईन यांनी प्रेमासाठी दिलेल्या या बलिदानाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. प्रेमी युगूल या दिवशी एकमेकांवरील प्रेमाची कबुली देतात. एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये असणार्या व्यक्ती आपल्या पार्टनरचा दिवस खास करण्यासाठी एकमेकांना शुभेच्छा, गिफ्ट्स देतात.
पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण भारतामध्ये केलं जात असल्याने काही संघटनांकडून त्याचा निषेधही केला जातो. दरम्यान व्हेलेंटाईन डे युरोप, अमेरिका, आशिया खंडामध्ये साजरा केला जातो. अनेकजण या दिवसाला आयुष्यभर विस्मरणीय करण्यासाठी लग्नासाठी हा दिवस खास राखून ठेवतात. मग यंदाच्या व्हेलेंटाईन डेचा तु,मचा प्लॅन काय आहे? हे आमच्यासोबतदेखील शेअर करा. आणि लेटेस्टली कडून तुम्हांला व्हेलेंटाईन डे 2020 च्या खास शुभेच्छा!