Valentine Day Horoscope (Photo Credits: unsplash.com)

 Valentine Day 2020 Horoscope: व्हॅलेंटाईन सप्ताह सुरु झाला असून आता सर्वांना उत्सुकता लागली व्हॅलेंटाईन डे ची म्हणजेच 14 फेब्रुवारी. प्रेमाचा गुलाबी दिवस म्हणून ओळखल्या जाणा-या या दिवशी कित्येक जण आपले ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ते व्यक्त करतील. यात कुणाची प्रेम व्यक्त करण्याची पहिलीच वेळ असेल तर कित्येक जण त्या व्यक्तीला आधीपासूनच ओळखत असतील. त्यामुळे जर कुणी एखाद्याला प्रपोज करत असेल तर आपल्याला समोरच्या कडून काय उत्तर येईल याबाबत अनेकांच्या मनात धास्ती असेल. त्यामुळे हा व्हॅलेंटाईन डे दिवस आपल्यासाठी कसा असेल हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असेल.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार, तुम्हाला यंदाचा व्हॅलेंटाईन डे कसा असेल हे सांगणार आहोत, जेणे करुन तुम्ही तुमचे व्हॅलेंटाईन डे चे प्लान्स बनवू शकता.

1. मेष: परिस्थिती अनुकूल बनवावं लागेल

तुमच्या नात्यात तुम्हाला संयम आणि प्रतिकूल परिस्थितीत समाधानकारक मार्ग काढावा लागेल. तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही मात्र निराश होण्याची आवश्यकता नाही. कारण सप्ताहाच्या शेवटी तुमच्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. घरातील वडिलधा-यांचे सहकार्य आण स्नेह मिळेल.

2. वृषभ: धैर्य ठेवलात तर सुखासह समाधानही मिळेल.

तुमचा हा सप्ताह आनंदीदायी असेल. तुम्ही लांब पल्ल्याच्या रायडिंगला जाऊ शकता. एकमेकांसाठी खरेदी करण्याची संधी मिळेल. एकमेकांचे प्रेम मिळण्यासाठी तुम्हाला एकमेकांची काळजी घ्यावी लागेल.

3. मिथुन: प्रेम व्यक्त करताना संवेदना कमी आणि गंभीरता जास्त बाळगा

चांगला जाईल. हा पूर्ण सप्ताह तुम्हाला चांगला जाईल. लव लाईफ सुद्धा रोमँटिक राहील. प्रेमाच्या गुजगोष्टी करण्यासाठी चांगली संधी मिळेल.

4. कर्क: कोणा महिलेचा सहयोग प्राप्त होऊ शकतो.

एकमेकांशी बोलून आपले नाते घट्ट बनवा. चांगल्या नात्यांमुळे या आठवड्यात तुमचा मूड चांगला राहील. कुणी महिला किंवा मित्र तुमच्या प्रेमात सकारात्मक बदल आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे हिंमत सोडू नका.

5. सिंह: तुमच्या प्रेमाचा शोध पूर्ण होईल.

तुम्हाला तुमचे खरे प्रेम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रयत्न सुरु ठेवा. सर्व चांगले होईल. तुमच्या आयुष्यात रोमँटिक वेळ येणार आहे. विवाहाचे योगही बनू शकतात.

6. कन्या: वाद करू नका, सप्ताह चांगला जाईल

तुमचे प्रेमसंबंध रोमँटिक राहतील. वेळ चांगला जाईल. मात्र सप्ताहात काही समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. त्यामुळे वाद टाळण्याचा प्रयत्न करा.

हेदेखील वाचा- Valentine Week 2020 List: यंदा रोझ डे ते वेलेंटाइन डे 2020 ची संपूर्ण लिस्ट PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा आठवड्याभराचं रोमॅन्टिक सेलिब्रेशन!

7. तूळ: जागा बदलणे लाभदायी ठरू शकते.

तुमचे लव्हलाईफ सुरळीत चालू आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा तुमच्या जोडीदारावर उमटेल. एखादी मोठी वस्तू किंवा प्रॉपर्टी खरेदी करु शकता.

8. वृश्चिक: अंर्तआत्माचे ऐकूनच काही निर्णय घ्या

हा सप्ताह तुमच्यासाठी लव्हलाईफ ने भरलेला असेल. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही कुठे फिरायला जाण्याचे प्लान करु शकता. तुम्हाला काही सुवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

9. धनु: कोणतीही जबाबदारी विचारपूर्वक घ्या

लवलाईफ चांगली असेल. मात्र कोणतीही जबाबदारी विचार करुन घ्या. आपला पूर्ण सप्ताह रोमँटिक असेल. Rose Day 2020: गुलाबाच्या रंगांप्रमाणे त्यांची संख्या देखील ठरवते त्यामागे दडलेल्या प्रेमाचा अर्थ; जाणून घ्या सविस्तर

10. मकर: सरप्राईज गिफ्ट मिळण्याची शक्यता

हा सप्ताह तुमच्यासाठी खूपच चांगला आणि लाभदायक असेल. तुम्हाला एखाद्या सुंदर महिलेची साथ सुद्धा मिळेल. काही सरप्राईजेस गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. त्यात संतुष्ट राहा, जास्तीची अपेक्षा करू नये.

11. कुंभ: अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम मिळण्याची शक्यता

सर्वकाही तुमच्या मनाप्रमाणे होईल. मात्र तुम्हाला जास्तीची अपेक्षा असेल. त्यामुळे हे तुम्हा दोघांसाठी त्रासदायक ठरु शकते. त्यामुळे कोणा मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद घ्या जेणेकरुन तुमचे मन शांत राहील.

12. मीन: वेळ चांगली नाही, हिंमत ठेवा

तुमच्या लवलाईफमध्ये थोडे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडे सांभाळून तुमच्या योजना आखा. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासाठी वेळ चांगला नाही. मात्र विश्वास आणि संयम ठेवल्यास हळूहळू गोष्टी तुमच्या बाजून होतील. तुमच्या जोडीदाराच्या विचारांचा आदर करा.

थोडक्यात सर्व राशींसाठी हा सप्ताह समाधाकारक प्रत्येक जोडप्याने आपल्या नात्यात विश्वास, संयम ठेवायला हवा. पाहा या गोष्टींनी तुमच्या लवलाईफमध्ये किती फरक पडतो ते.

 (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठी यातुन कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही. )