व्हॅलेंटाईन सप्ताहाला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून या सप्ताहाची सुरुवात होणार आहे Rose Day ने. या दिवशी अनेक जण आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाबाचे फूल देऊन आपले प्रेम व्यक्त करतील. प्रेमाचे प्रतीक मानले जाणारे गुलाबाचे फूल या दिवशी जितके महत्व असते तितकेच महत्व त्याच्या रंगाला देखील असते हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेलच. पण तुम्हाला हे माहित आहे का, की तुम्ही देणा-या गुलाबांची संख्या देखील तुमची त्यामागची भावना व्यक्त करते आणि तुमचे समोरच्या व्यक्तीवर कोणत्या प्रकारचे प्रेम व्यक्त करते. ऐकून धक्का बसला असेल, पण हे खरे आहे.
तुम्ही तुमच्या आवडत्या जे गुलाबाचे फूल द्याल, ते किती आणि कसे द्यावे हे देखील लक्षात ठेवा. ज्याच्यामुळे तुम्हाला समोरच्या व्यक्तीला जे सांगायचे आहे ते अगदी सहजपणे त्याच्या हृद्यापर्यंत पोहोचेल.
1) 1 फूल- जर तुम्हाला कोणाला धन्यवाद बोलायचे असेल तर 1 गुलाब द्या
2) 2 फूल- जर तुम्हाला कोणाला लग्नाची मागणी घालायची असेल तर दोन लाल रंगांची फुले द्या. तर आपल्या नात्यात प्रेम आणि शांती टिकून राहावी यासाठी 1 लाल आणि 1 पांढ-या रंगाचे फूल द्यावे.
3) 6 फूल- जर तुम्हाला तुमचे नाते दीर्घकाळापर्यंत टिकून राहावे असे वाटत असेल तर 6 फूलं द्यावी.
4) 11 फूल- तुमच्या प्रेमाचे गहिरेपण, सच्चेपणा दाखविण्यासाठी तुमच्या प्रिय व्यक्तीला 11 गुलाबाची फुले द्यावीत.
5) 13 फूल- जर तुम्हे एखाद्याचे गुप्त रुपाचे प्रशंसक असाल किंवा तिला फॉलो करत असाल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला 13 गुलाब द्या.
वरील लेख वाचून एव्हाना तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला किती गुलाब द्यायचे हे मनाशी पक्क केलं असाल. पाहा याचा काही फायदा होतो का ते आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरुर कळवा.