Rose Day Best Gift Ideas: एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमीयुगुलांसाठीचा सर्वात महत्त्वाचा दिवस व्हॅलेंटाईन डे अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. 7 फेब्रुवारी पासून व्हॅलेंटाईन सप्ताहाला सुरुवात होणार असून या दिवशी जगभरात 'रोज डे' (Rose Day) साजरा केला जाईल. या दिवशी आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाबाचे फूल देऊन आपले प्रेम व्यक्त करुच पण त्यासोबत काही छान आणि जोडीदाराला छानसे गिफ्ट दिले तर नक्कीच तुमचा जोडीदार तुमच्यावर खूश होईल.
रोज डे म्हटलं की गिफ्टसाठी सर्वात आधी डोळ्यासमोर येते ते गुलाब. मात्र हे गुलाब थोड्या विशिष्ट पद्धतीने किंवा हटके अंदाजात तुमच्या जोडीदाराला दिले तर कदाचित ते देण्यामागे तुमची भावना त्याच्यापर्यंत नक्की पोहोचेल.
पाहा Rose Day च्या काही भन्नाट आयडियाज:
1. गुलाबांचा गुच्छ
गुलाबांच्या गुच्छासह त्या व्यक्तीला आवडणारी एखादी गोष्ट उदा. चॉकलेट्स, रिंग, गॅजेट्स त्या गुच्छावर ठेवून त्याला दिलीत तर हे देखील हे हटके गिफ्टस होऊ शकते.
2. रोज कुकीज हॅम्पर
तुमच्या प्रिय व्यक्तीला पेस्ट्रीज, कुकीज आवडत असतील तर तुम्ही ऑनलाईन किंवा केक शॉप मधून रोजच्या आकाराचे कुकीज, डेस्जर्ट्स बनवून घेऊ शकता.
Types Of Kisses: जोडीदारासोबतचे नाते आणखी घट्ट करण्यास मदत करतील हे 7 प्रकारातील चुंबन
3. रोज सेंटेड हॅम्पर
सुगंध हा कोणाला आवडत नाही अशा वेळी गुलाबाचा सुगंधाचे सुगंधी द्रव्ये, परफ्यूम्स तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला देऊ शकता.
4. Rose/Heart च्या आकाराची ज्वेलरी
यात तुम्ही हार्ट किंवा गुलाबाच्या आकाराचे लॉकेट्स, पेंडंट्स, रिंग, ब्रेसलेट, ईअरिंग्स देऊ शकता.
5.Heart च्या आकाराचे घड्याळ किंवा फोटो फ्रेम
हृदयाच्या किंवा गुलाबाच्या आकाराचे किंवा गुलाबाचे चित्र असलेले भिंतीवरील घड्याळ, फोटो फ्रेम तुम्ही गिफ्ट करु शकता.
रोज डे निमित्त तुम्ही तुमच्या पार्टनरच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही त्यांना गिफ्ट देऊ शकता. मात्र त्यांची कनेक्शन कुठे ना कुठे तरी प्रेमाशी, गुलाबाशी, हृद्याशी असलेले पाहिजे एवढे फक्त लक्षात ठेवा.