Ghatasthapana Wishes in Marathi 2020: आश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीला देवीच्या घटांची स्थापना केली जाते. यंदा 17 ऑक्टोबरला हे घट बसवले जाणार आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. या नवरात्रीचा (Navratri) देवीचा जागर करून लोक उपवास करतात. देवीची पूजाअर्चा करून रासगरबा ज्याला सध्या दांडिया असे म्हटले जाते हे खेळ रंगतात. मात्र यंदा कोरोना व्हायरसचे या उत्सवावर आणि उत्साहावर सावट असल्यामुळे लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येण्याचे आव्हान केले जात आहे. यामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी फिरले यंदा हा उत्सव कसा साजरा करायचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र त्यासाठी हिरमूसुन न जाता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एकमेकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊ शकता.
त्यासाठी अनेकांची बोटं ही मोबाईलकडे चांगले शुभेच्छा संदेश शोधण्याच्या कामास लागली असतील. पण जर का तुम्हाला मराठीतून सर्वांना नवरात्री सणाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर पुढे दिलेले शुभेच्छा संदेश नक्कीच कामी येतील.
हे अंबे, या महामारीत तुजविण आम्हा कोण तारी
दाखव तुझी किमया पुन्हा होऊ दे हसरी दुनिया सारी
घटस्थापना आणि नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा
अंबे मातेची सेवा करण्यासाठी आली शारदीय नवरात्र
सदैव राहो तुझी कृपादृष्टी यत्र तत्र सर्वत्र
घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!
कोरोनाला हरवायला हात धुणे, मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग पाळाही आहे त्रिसूत्री
आणि मग उत्साहात साजरी करा नवरात्री!
शारदीय नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आई दुर्गा तुम्हाला तिच्या 9 भुजांनी शक्ती,बुद्धी, ऐश्वर्य, सुख, आरोग्य, शांती,
सुयश, निश्चितता, समृद्धी देवो हिच मातेच्या चरणी प्रार्थना
नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Happy Navratri 2020 Wishes (Photo Credits: File)
घटस्थापना आणि नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा!
नवरात्रीत घरोघरी घट स्थापना केली जाते. ह्या नवरात्रींत देवीपुढे अखंड दिप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची छान छान भजने, स्त्रोत्रं म्हटली जातात. त्याचबरोबर रास गरब्याचा खेळ रंगतो. मात्र यंदा घरच्या घरी अगदी शांततामय पद्धतीने साजरा करावा हिच सर्वांना विनंती.