
जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Workers' Day 2021) किंवा जागतिक कामगार दिन म्हणून पाळला जातो. 17 व्या शतकात युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात होऊन एका नव्या पर्वाचा आरंभ झाला. याचसोबत उद्योजकतेचा महत्वाचा स्तंभ असलेल्या कामगारांच्या शारीरक तसेच काही प्रमाणात मानसिक पिळवणूकीलाही सुरुवात झाली. पुढे 15 तासांच्या ऐवजी 8 तासांच्या दिवसाच्या मागणीसाठी कामगार चळवळ उभी राहिली. याच्या स्मरणार्थ कामगार दिन साजरा होतो. या संदर्भातील पहिली मागणी 1856 मध्ये ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली. त्यानंतर 1 मे 1886 रोजी अनेक संघटनांनी एकत्र येऊन त्यांच्या मागणीसाठी मोर्चे व आंदोलने सुरु केली.
पुढे पॅॅरीस परिषदेत 1 मे 1890 हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. सध्या जवळजवळ 80 देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे. तर या दिवशी खास मराठी Images, HD Wallpaper, WhatsApp, Facebook Status, Messages, Wishes शेअर करून द्या कामगार बंधूंना शुभेच्छा.
कोरोनाच्या काळातही स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरतो,
अतोनात मेहनत करून कष्टाची भाकर खातो
अशा सर्व कष्टकरी बांधवांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जो मेहनतीने त्रासाला दूर करतो,
रक्त आणि घाम गाळण्यासाठी जो मजबूर असतो,
तो प्रत्येक जण 'मजदूर’ असतो…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्मीचे मंदिर समृद्धीने तेजाळले
कामगाराचे रक्त आणि घाम
पायाच्या कामी आले…
घामाला मिळाला मानाचा मुजरा
1 मे करुया त्यासाठी साजरा
कामगार दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!

तू जिवंत ठेवतोस कामाचे आगार,
उभारतोस स्वप्नांचे मीनार
कामगारा तुझ्या कष्टाला,
लाख लाख सलाम
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्नमाला लाभो मोल सर्वदा, अन् घामाला मिळो दाम,
या हातांना मिळो काम, अन् कामाला मिळो सन्मान
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दरम्यान, कामगारांच्या याच चळवळीमुळे योग्य पगार, चांगली वागणूक, पगारी सुट्टी आणि 8 तास काम या मागण्या मान्य झाल्या. भारतातल्या ‘लेबर किसान पार्टी’ने तत्कालीन मद्रास येथे 1 मे 1923 रोजी पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. दुसरीकडे 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली म्हणून 1 मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात येतो. महत्वाचे म्हणजे मुंबईसह आजच्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी, राज्यातील कामगार-शेतकरी वर्गाने डावे पक्ष, डावे विचारवंत, साहित्यिक आणि नेते यांच्या नेतृत्वाखाली चळवळ केली होती.