International Women's Day Wishes in Marathi (Photo Credits: File)

Women's Day Wishes in Marathi: जिच्यामुळे आपण आहोत, जिच्यामुळे आपण या पृथ्वीवर जन्म घेतो अशा नारीशक्तीचा सन्मान करण्यासाठी 8 मार्च रोजी 'जागतिक महिला दिन' (International Women's Day) साजरा केला जातो. आपल्या घरासाठी, आपल्या माणसांसाठी, आपल्या अस्तित्वासाठी लढणा-या स्त्रियांच्या सन्मानासाठी याहून चांगला दिवस असू शकत नाही. खरंतर जागतिक महिला दिन हा प्रथम न्युयॉर्क येथे 28 फेब्रुवारी 1909 रोजी साजरा करण्यात आला. परंतु 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचनांनुसार 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. या दिनानिमित्त तमाम महिलांना सोशल मिडियाद्वारे शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

तसे पाहायला गेले तर प्रत्येक दिवस हा स्त्रीच्या सन्मानाचाच असला पाहिजे. त्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे हे प्रत्येकाने नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे त्यांचा नेहमीच आदर केला पाहिजे. म्हणून महिला दिनानिमित्त त्यांना खास शुभेच्छा संदेश पाठवून त्यांना मान देण्याची संधी कोणीही दवडता कामा नये.

ती आई आहे, ती ताई आहे,

ती मुलगी आहे, ती मैत्रिण आहे,

ती पत्नी आहे, ती सून आहे,

ती सासू आहे, ती आजी आहे.

पण याआधी ती एक स्त्री आहे.

जिचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

International Women's Day Wishes in Marathi (Photo Credits: File)

ती आहे म्हणून हे विश्व आहे

ती आहे म्हणून घराला घरपण आहे

ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे

तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

International Women's Day Wishes in Marathi (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- International Women's Day 2021 Gift Ideas: 'जागतिक महिला दिना'निमित्त तुमच्या आयुष्यातील खास स्त्री ला द्या हे अनोखे गिफ्ट 

इंग्रजीत म्हणतात लेडी, मराठीत म्हणतात महिला

जिच्यामुळे आपण या जगात श्वास घेतो पहिला

अशा स्त्रीचा प्रत्येकाला वाटतो अभिमान

कायम करा अशा स्त्रीचा सन्मान

Happy Women's Day!

International Women's Day Wishes in Marathi (Photo Credits: File)

विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू

एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

International Women's Day Wishes in Marathi (Photo Credits: File)

मुलीच्या निखळ प्रेमाला सलाम

आईच्या नि:स्वार्थ त्यागाला सलाम

बहिणीच्या प्रेमळ मायेला सलाम

स्त्रीमध्ये दडलेल्या असामान्य स्त्री शक्तीला सलाम

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

International Women's Day Wishes in Marathi (Photo Credits: File)

स्त्री ने अनेक क्षेत्रात आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. घर, संसार, नोकरी, कुटुंब ही तारेवरची कसरत ती अगदी लिलया सांभाळते. मात्र या सगळ्यात स्वतःच्या आरोग्याकडे, इच्छांकडे, मतांकडे दुर्लक्ष करु नका. कोणतरी चांगलं म्हणण्यासाठी, कौतुक करण्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध निर्णय घेऊ नका. तुमच्या इतकंच तुमच्या इच्छांना, विचारांना आणि मतांना महत्त्व द्या. जागतिक दिनानिमित्त ही एक गोष्ट प्रत्येक स्त्रीने नक्कीच केली पाहिजे.