Hanuman Jayanti 2020 Marathi Wishes: रामभक्त, पवनपुत्र अशी ओळख असणाऱ्या हनुमानाचा (Lord Hanuman) यंदा 8 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्तावर जन्मसोहळा पार पडणार आहे, हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) नावाने हा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हनुमानाच्या मंदिरात यादिवशी भक्तांच्या रांगा लागतात, कुठे हनुमाच्या मूर्तीवर तेलाचा अभिषेक तर कुठे जयंती निमित्त भंडारा तर कुठे रामायणाचे (Ramayan) चलचित्र दाखवून हा सोहळा अगदी धामधुमीत साजरा होतो. यंदा मात्र सणांंवर कोरोना व्हायरस रुपी संकट असल्याने चार चौघात मिळून हा सण साजरा करता येणार नाही. पण म्ह्णून सणाचा उत्साह थोडीच कमी होतो? उलट यंदा आपल्याकडे नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने सण साजरा करण्याची संधी आहे, यादिवशी धामधूम करण्याऐवजी हनुमानाची घरीच पूजा करा. सोबतच हनुमान जयंती विशेष शुभेच्छा देण्यासाठी हे काही मराठी Messages, Greetings, GIFs , Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून शेअर करून तुम्ही यंदा लाडक्या बजरंगबलीचा जन्मसोहळा साजरा करू शकता. हनुमान जयंती साजरी करण्याचे महत्व काय? जाणुन घ्या बजरंगबलीची जन्मकथा आणि यंदाचा मुहुर्त
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
अनादिनाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला
हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
मुखी राम नाम जपि योगी बलवान
लंकेचा नाश करी असा सर्व शक्तिमान
आकाशापरी मोठा कधी मुंगीहून लहान
हृदयी वसती राम असा भक्त हनुमान
हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!!
ज्याच्या तनी मनी वसतो राम
जो साऱ्यांमध्ये असे बलवान
असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान
हनुमान जयंतीच्या खूप शुभेच्छा
ध्वजांगे उचली बाहो
आवेशे लोटले पुढे
काळाग्नी कालरुद्राग्नी
देखता कापती भये
हनुमान जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा
राम लक्ष्मण जानकी
जय बोलो हनुमान की
जय बजरंगबली
हनुमान जयंतीच्या खूप शुभेच्छा
हनुमान जयंती स्पेशल GIFs
दरम्यान, हनुमान जयंती साजरी करण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे अलीकडे दूरदर्शनवर पुन्हा एकदा रामायण सुरु झाले आहे, या निमित्ताने ही मालीका पाहून सुद्धा तुम्ही हनुमान जयंती साजरी करू शकता. काय करायचं हे तुम्ही ठरवा पण काहीही झालं तरी यंदा घराबाहेर पडू नका. तुम्हाला सर्वांना हमुंना जयंती निमित्त लेटेस्टली कडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा!