
Happy Hanuman Jayanti 2020 Marathi Messages: चैत्र पौर्णिमेला बजरंगबली हनुमानाचा जन्म झाला म्हणून या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात हनुमान जयंती साजरी केली जाते. पुराणात सांगितलेल्या कथेप्रमाणे अमरत्वाच्या प्राप्तीसाठी जेव्हा देव आणि राक्षसांमध्ये युद्ध पेटलं तेव्हा समुद्रमंथनातून अमृत असूरांनी पळवलं. त्यावेळेस भागवान शिवाने वीर्य त्याग केला आणि पवनदेव (वायुदेवता) वानरराज केसरी यांची पत्नी अंजना यांच्या गर्भामध्ये प्रवेश झाला. त्यामधून अंजनाने हनुमानाला जन्म दिला. हा दिवस चैत्र पौर्णिमेचा असल्याने या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी सारे हिंदू बांधव हनुमानाची पूजाअर्चा करुन, मंदिरात जाऊन मारुतीचे दर्शन घेऊन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हनुमानाचा जन्मोत्सव साजरा करतात.
अशा या मंगलमयी दिवसाचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आणि हनुमानाच्या भक्तीत लीन होण्यासाठी आपल्या आप्तलगांना द्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
अंजनीच्या सुता, पवनपुत्र बजरंगबली
ज्याने आपल्या शेपूटाने रावणाची लंका जाळली
अशा मर्कटरुपी हनुमानाचा आला जन्म दिन
ज्याच्या चरणी समस्त भक्तगण होई लीन
हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

रामाचा भक्त ऐसा, वा-याचा पुत्र ऐसा
उडवी दाणादाणं, शत्रूची उडवी दाणादाणं
त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान
श्री हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
हेदेखील वाचा- Hanuman Jayanti 2019: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा

सूर्याचा करी घास वीरांचा वीर खासं
करितो तो उड्डाण देव मग घालितो थैमान
रामभक्ती चा सदैव मनी असे भाव
बजरंगबली आहे त्याचे नाव
हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती
वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान
एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

हनुमानाला भगवान शिवाचा रूद्रअवतार समजलं जातं. त्यासोबतच 'पवनपुत्र', 'बजरंगबली' म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रात हनुमानाला 'मारूती' असं देखील संबोधलं जातं. मारुतीरायाला प्रसन्न करून आत्मबळ प्राप्त होत असल्याची भक्तांची भावना असल्याने हनुमान जयंतीचा उत्सव जगभरातील हनुमान भक्त उत्साहाने साजरा करतात. लेटेस्टली मराठीकडून तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!!!