Happy Hanuman Jayanti: येत्या 19 एप्रिल रोजी हनुमान जयंती सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. तसेच हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या आनंद-उत्सवामध्ये भाविक साजरा करतात. कोणत्याही शुभ कामासाठी सुद्धा हा दिवस उत्तम असल्याचे गुरुंजींकडून सांगितले जाते. एवढेच नसून या दिवशी तुमच्या मनातील कोणतीही इच्छा हनुमाना समोर व्यक्त केल्यास ती पूर्ण होते असे मानले जाते.
हनुमानाला या दिवशी लाल कुंकुवाचा लेप लावून पुजा करु शकता. तसेच मंदिरात लाल रंगाची चोली चढवल्यास भाविकांना त्याचा लाभ होतो. तसेच या दिवशी हनुमानाच्या मुर्तिला स्पर्श केल्यास सकारात्मक उर्जा मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर हनुमान जयंती निमित्त हे उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.(हेही वाचा-Happy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं आणि GIF's...)
- तुम्हाला पैशांसंबंधित काही समस्या असल्यास हनुमान जयंती दिवसी पिंपळाच्या 11 पानांवर त्यावर श्रीराम लिहून हनुमानाला अर्पण करा.
-तसेच मंदिरात जाताना हनुमानाच्या नावाचा जप करा. त्याचसोबत हनुमान चालिसाचे 11 वेळा पठण करा.
- हनुमानाची पूजा करताना दिवा लावण्यापूर्वी त्यात तेल आणि लवंग टाकल्यास तुमचे कष्ट दूर होतात.
-व्यापार-उद्योगधंद्यात भरभराट होण्यासाठी हनुमानाला या दिवशी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करा.
-शूत्रूंपासून सुटका मिळवण्यासाठी 5 तुपातील पोळ्यांचा नैवेद्य दाखवा.
(हेही वाचा-Hanuman Jayanti 2019: महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत ही 11 मारुती मंदिरं)
हनुमानाची या दिवशी निर्मळ भावनेने पूजा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हनुमानाच्या मंदिरात जावून किंवा अगदी घरी देखील हनुमानाची पूजा केली जाते. हनुमानाप्रमाणे शरीरयष्टी, ताकद प्राप्त व्हावी, त्यासाठी तरुणांमध्ये व्यायामाची गोडी निर्माण व्हावी, म्हणून समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात 11 ठिकाणी हनुमानाची मंदिरं स्थापन केली.