Happy Hanuman Jayanti Marathi Messages and Wishes: हनुमान जयंती (Hanuman Jayanti) म्हणजे हनुमानाच्या जन्माचा उत्सव. चैत्र पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झाला. रामनवमीनंतर लगेचच हनुमान जयंतीचा उत्सव येतो. हनुमान हे श्रीरामाचे एकनिष्ठ भक्त आणि सेवक होते. भारतातील विविध राज्यात 'हनुमान जयंती' च्या तारखांमध्ये तफावत! पाहा कधी कुठे साजरी केली जाते हनुमान जयंती
हनुमान जयंतीचा उत्सव देशभरात साजरा केला जातो. हनुमानाच्या मंदिरात जावून किंवा अगदी घरी देखील हनुमानाची पूजा केली जाते. हनुमानाप्रमाणे शरीरयष्टी, ताकद प्राप्त व्हावी, त्यासाठी तरुणांमध्ये व्यायामाची गोडी निर्माण व्हावी, म्हणून समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात 11 ठिकाणी हनुमानाची मंदिरं स्थापन केली.
वायुपूत्र हनुमान ब्रम्हचारी, शक्तीमान, विद्वान होते. अशा या बहुगुणी हनुमानाच्या जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, शुभेच्छापत्रं, GIFs...
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
मुखी राम नाम जपि योगी बलवान
लंकेचा नाश करी असा सर्व शक्तिमान
आकाशापरी मोठा कधी मुंगीहून लहान
हृदयी वसती राम असा भक्त हनुमान
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
रामाप्रती भक्ती
तुझीराम राखे अंतरी
रामासाठी शक्ती
तुझीराम राम बोले वैखरी
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
सत्राणे उड्डाणे हुंकारे वदनी
करी डळमळ भूमंडळ सिंधुजळगगनी
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
GIF's
मेसेज व्हिडिओ:
लोकांनी हनुमानासारखे बलवान आणि चारित्र्यसंपन्न होण्याचा प्रयत्न करावा, हा विचार, संदेश हनुमान जयंती साजरी करण्यामागे असावा.