
भारतामध्ये ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार हा फ्रेंडशीप डे (Friendship Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा 7 ऑगस्ट दिवशी या महिन्यातला पहिला रविवार असल्याने त्या दिवशी फ्रेंडशीप डे साजरा केला जाणार आहे. तरूणाईमध्ये या दिवसाच्या सेलिब्रेशनची विशेष क्रेझ आहे. शाळा, कॉलेज मध्ये एकमेकांना फ्रेंडशीप बॅन्ड बांधून हा दिवस साजरा करण्याची पद्धत आहे. आता काळ बदलला, ट्रेंड्स बदलले आहेत. त्यामुळे सेलिब्रेशनची पद्धतही बदलणार. सोशल मीडीयाशिवाय आजच्या तरूणाईचा क्षणही जाणं शक्य नाही त्यामुळे सोशल मीडीयात Facebook Messages, WhatsApp Status, Images, Greetings द्वारा या मैत्री दिनाच्या शुभेच्छा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.
फ्रेंडशीप हे असं एक नातं आहे जे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे पण ते इतर जवळच्या नात्यांप्रमाणे आपोआप आलेले नसून आपण निवडलेलं असतं. त्यामुळे तुमच्या आयुष्यात मित्र मैत्रिणी विचारपूर्वक निवडा. एकदा निर्माण झालेला हा मैत्रीचा धागा काळजीपूर्वक जपायला देखील विसरू नका. त्यासाठीच हा आजचा फ्रेंडशीप डे आहे. नक्की वाचा: Happy Friendship Day 2022 Images: फ्रेंडशिप डे निमित्त तुमच्या प्रिय मित्र-मैत्रिणींना मराठी Quotes, Messages, WhatsApp Status, HD Greetings, Wallpapers शेअर करुन द्या विशेष शुभेच्छा.
फ्रेंडशीप डे 2022 च्या शुभेच्छा

चांगली मैत्री नाजूक वस्तू प्रमाणे असते
फार काळजीपूर्वक जपायची असते
हॅप्पी फ्रेंडशीप डे!

चांगल्या काळात हात धरणं
म्हणजे मैत्री नव्हे
वाईट काळात हात न सोडणं म्हणजे मैत्री
हॅप्पी फ्रेंडशीप डे!

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी
हॅप्पी फ्रेंडशीप डे!

मैत्री असावी मना मनाची,
मैत्री असावी जन्मो जन्मांची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी
हॅप्पी फ्रेंडशीप डे!
शाळा, कॉलेज, कामाचं ठिकाण अशा विविध टप्प्यावर अनेक लोकं आपल्याला भेटतात. त्यामधूनच मैत्री सुरू होते आणि पुढे ती बहरत जाते. पण इतर कोणत्याही नात्याप्रमाणे मैत्रीचं नातं देखील टिकवण्यासाठी ते दोन्ही बाजूने जपणं आवश्यक आहे. मग यंदाच्या फ्रेंडशीप डे चं औचित्य साधून मित्र-मंडळींसोबत थोडा वेळ घालवा.