Happy Friendship Day Images in Marathi: यावर्षीचा फ्रेंडशीप डे जरा खास असणार आहे कारण कोरोनाच्या (Corona) पार्श्वभुमिवर गेले 2 वर्ष आपण सगळे सण, उत्सव हे कुठल्याही सेलिब्रेशनविना (Celebration) साजरे केले. पण यावर्षी आपण आपल्या मित्रपरिवाराला प्रत्यक्ष भेटून आपण फ्रेंडशिप डे साजरा करु शकणार आहोत. पण आपले काही जिवलग असेही आहेत ज्यांना आपण प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देवू शकत नाही पण डिजीटल माध्यमातून (Digital Media) आपण आपल्या शुभेच्छा नक्कीच पाठवू शकतो. अशाचं तुमच्या जिग्गी दोस्तांना पाठवण्यासाठी काही खास शुभेच्छा कार्ड (Card), वॉलपेपर्स (Wallpapers), मेसेजेस (Messages) आम्ही तुमच्यासाठी घेवून आलोय. जागतिक स्तरावर 2011 पासून फ्रेंडशीप डे 30 जुलैला साजरा करतात पण तत्पूर्वी तो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जायचा. भारतात मात्र अजूनही ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारीचं फ्रेंडशीप डे साजरा करतात. त्यानुसार यावर्षी 7 ऑगस्टला भारतात फ्रेंडशीप डे साजरा करण्यात येईल.
फ्रेंडशिप डे आंतराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येतो. भारतात ही तरुण वर्गात या दिवसाचं विशेष महत्व बघायला मिळत. या दिवशी मित्रमैत्रीणी एकमेकांना फ्रेंडशीप बॅन्ड बांधतात,भेटवस्तू, ग्रीटींग कार्ड, पुष्पगुच्छ अशी विविध भेटी देतात.
सोशल मिडीयाच्या क्रांतीनंतर तर फ्रेडशीप डेच्या उत्सवात मोठे बदल बघायला मिळाले. तरी हा दिवस मित्रच्या नात्यासाठी खास आहे. जे नात रक्ताचं नाही पण मनापासून एकमेकांबरोबर जोडलेलं आहे अशा नात्याचा विशेष उत्सव म्हणजे फ्रेडशीप डे!