Representational Image (Photo Credits: unsplash.com)

जगभरामध्ये आज (30 जुलै) जागतिक मैत्री दिवस (International Friendship Day)  साजरा केला जात आहे. भारतासह काही देशांमध्ये येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्ट दिवशी पुन्हा' फ्रेंडशिप डे' (Friendship Day)  साजरा केला जाणार आहे. मैत्रीचं नातं हे आपल्या आयुष्यात आपण निवडलेल्या माणसांपैकी एक असतं. त्यामुळे त्याच्याबद्दल गुंतागुंत देखील अधिक असते. मैत्री म्हणजे धम्माल, मस्ती, जिव्हाळा असला तरीही यामधून अनेकदा मतमतांतर, खटके, पझेसिव्हनेस यामधून होणारी भांडणं देखील असतात. जेव्हा मैत्रीची परीक्षा पहाणारा असा कठीण काळ असतो तेव्हा तुम्ही स्थिती कशी हाताळता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पण अनेकदा मत-मतांतरांपेक्षा एकमेकांना समजून घेत नातं जपणं अधिक महत्त्वाचं असतं. मग तुमच्या बेस्ट फ्रेंडसोबत तुमचं देखील भांडण, मतभेद झाले असतील तर पहा यामधून नेमका शांतपणे मार्ग कसा काढता येऊ शकतो? International Friendship Day 2020 Messages: जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा Wishes, Quotes, HD Images च्या माध्यमातून देऊन दृढ करा मैत्रीचंं नातं!

चूक असेल तर माफी मागा आणि त्याची जाणीव ठेवा

via GIPHY

तुमची चूक असेल तर माफी मागण्यात कोणताच छोटेपणा नाही. एकमेकांमधले समज-गैरस्मज दूर करा. रागाच्या भरात किंवा चुकून तुमच्या झालेल्या चूकीची कबुली दिल्यानंतर त्याची जाणिव देखील ठेवा. तुमचा मित्र/मैत्रिण तुम्हांला ओळखून आहे. तुमच्या सॉरी मध्ये त्यांना प्रामाणिकपणा सहज दिसून येईल.

एकमेकांसमोर विषय संपवा

via GIPHY

व्हर्च्युअल जगाचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. गोष्टी खूप ताणण्यापेक्षा वेळीच त्याबद्दल बोला. आणि अर्थाचा अनर्थ निघू नये असे वाटत असेल तर शक्यतो मेसेज वर बोलण्यापेक्षा एकमेकांशी समोरासमोर बोलून विषय संपवा.

विसरा आणि पुढे जा

via GIPHY

अनेकदा क्षुल्लक गोष्टि या वादाचं, गैर समजुतीचं कारण ठरतात. गोष्टी अगदी साध्या सरळ, सोप्या असतील तर विनाकरण त्यामध्ये गुंतागुंत वाढवू नका. एकमेकांना समजून घ्या. अहंकार ना बाळगता गोष्टी विसरायला शिका.

ऐकायला शिका

via GIPHY

अनेकदा नाण्याची एकच बाजू आपण बघून त्यावरून संपूर्ण निष्कर्ष काढतो. पण टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी नाण्याच्या पलिकडची बाजू देखील पहायला शिका. समोरची व्यक्ती त्या वेळी कोणत्या परिस्थितीमध्ये होती हे ऐकून घ्या. बोलून विषय संपवा. केवळ प्रत्युत्तरासाठी नाही तर समजून घेण्यासाठी समोरच्याचं बोलणं ऐका.

भांडणांमधूनही शिका

भांडणं तुमच्या नात्याला अधिक मजबूत बनवू शकतात पण तुम्ही त्यामधून काही शिकू शकलात तर! प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. त्यामुळे एखाद्या परिस्थितीमध्ये तुमची आणि समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया देण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. यामधून तुम्हांला तुमच्यातील देखील काही उणिवा समजू शकतात. भविष्यात त्यावर काम करा.

सेलिब्रेट

via GIPHY

भांडण मिटलं तर ते सेलिब्रेट देखील करायला हवं! काही वर्षांनी मागे फिरून बघतात याच लहान लहान गोष्टींवरून तुम्ही हसाल.

मैत्रीचा धागा या आपल्या भावनिक विश्वावर बर्‍याच अंशी अवलंबून असतो. त्यामुळे तो जपताना कधी, किती ताणायचा? आणि कधी किती मोकळा सोडायचा याचं गणित जीवनातील अनेक लहान मोठे अनुभव तुम्हांला आयुष्यभर देणार आहेत. ते स्वीकारायला शिका. तुमच्या आयुष्यात असलेली मित्रमंडळी कायम तुमच्या सोबत राहोत! त्यामध्ये वाढ होत राहो हीम आमची सदिच्छ! हॅप्पी फ्रेंडशीप डे.