International Friendship Day 2020| File Image

Happy International Friendship Day 2020 Marathi Wishes :  मैत्रीच्या नात्यामध्ये असणारी व्यक्ती ही आपल्या निवडीवर अवलंबून असलेल्या काही व्यक्तींपैकी एक असते. त्यामुळे मैत्री, जिव्हाळा जपण्यासाठी वर्षातले काही दिवस खास असतात. दरम्यान जगभरात दरवर्षी 30 जुलै हा दिवस जागतिक मैत्री दिवस (International Friendship Day) म्हणून साजरा केला जातो. 2011 साली संयुक्त राष्ट्र च्या बैठकीमध्ये दोन लोकांमधील, संस्कृती मधील, देशांमधील मैत्रीचं नातं वाढवण्यासाठी, अधिक दृढ करण्यासाठी या दिवसाच्या सेलिब्रेशनची सुरूवात झाली आहे. मग आज तुमच्या आयुष्यातील खास मित्रमंडळींचा दिवस स्पेशल करण्यासाठी त्यांना फेसबूक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॅपच्या माध्यमातून मैत्री दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश, एसएमएस, मेसेजेस, GIFs, HD Images, Wallpapers यांच्यामाध्यमातून शुभेच्छापत्रं शेअर करून तुमच्या मैत्रीमधील बॉन्डिग अधिक दृढ करा.

भारतामध्ये फ्रेंडशिप डे हा दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करण्याची पद्धत आहे. यंदा 2 ऑगस्ट दिवशी फ्रेंडशिप डे साजरा होईल. मात्र त्यापूर्वी यंदाच्या International Friendship Day 2020 ने तुमच्या मित्रांना जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. International Day of Friendship 2020 Virtual Celebration Ideas: लॉकडाऊनच्या काळातही बेस्ट फ्रेंड्स सोबत सुरक्षित पण बिनधास्त असं करू शकाल सेलिब्रेशन!

International Friendship Day 2020 शुभेच्छा! 

शत्रूला हजार संधी द्या मित्र बनण्यासाठी

पण मित्राला एकही संधी देऊ नका शत्रू बनण्यासाठी

International Friendship Day च्या शुभेच्छा!

International Friendship Day 2020| File Photo

जीवन आहे तर आठवणी आहेत

आठवण आहे तर भावना आहेत

भावना आहे तिथे मैत्री आहे,

आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तू आहे

जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Friendship Day 2020 | File Image

via GIPHY

आज काल आमच्यावर जळणारे

खूप आहेत

त्यांना आता जळू दया...

आम्हाला साथ देणारे

मित्र भरपूर आहेत

हे त्यांना कळू दया...

Happy International Friendship Day 2020 | File Image

via GIPHY

मैत्री हा विचित्र खेळ आहे

दोघांनी तो खेळताना

एक बाद झाला तरी

दुसर्‍याने डाव सांभाळायचा असतो!

Happy Friendship Day 2020| File Image

भारतामध्ये अजूनही कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकट शमलेले नाही. त्यामुळे लॉकडाऊनचा कितीही कंटाळा आला तरीही बाहेर पडू नका. घरी राहून व्हर्च्युअल माध्यमातून एकमेकांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा द्या. लेटेस्टली कडून जागतिक मैत्री दिनाच्या तुम्हांला खूप खूप शुभेच्छा!